Home /News /money /

RailTel IPO: कशी कमाई करेल रेल्वेचा हा IPO? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून डिटेल्स

RailTel IPO: कशी कमाई करेल रेल्वेचा हा IPO? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून डिटेल्स

Railway

Railway

Railtel IPO: IRCTC आणि IRFC नंतर भारतीय रेल्वेशी संबंधित आणखी एक कंपनी रेलटेल कॉर्पोरेशनचा आयपीओ 16 फेब्रुवारी उघडला आहे. यात 18 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकता.

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: Railtel IPO शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी कमाईची आणखी एक चांगली संधी आहे. IRCTC आणि IRFC नंतर भारतीय रेल्वेशी संबंधित आणखी एक कंपनी रेलटेल कॉर्पोरेशनच्या आयपीओचं (Initial Public Offering) बिडिंग आज म्हणजे 16 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलं आहे. तुम्ही 18 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकता. रेलटेलचे शेअर बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या दोन्हींच्या एक्सचेंजवर लिस्ट केले जातील. यामध्ये सरकार आपल्या वाट्याचे 27 टक्के म्हणजे 8.7 कोटी रुपयांचे शेअर विकणार आहे. गुंतवणूकदारांनी काय करावे? मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या डेट फ्री बॅलेन्सशीटला बघून प्रत्येक ब्रोकरेज हाऊसने यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त कंपनीचे मूल्यांकनदेखील खूप चांगलं आहे. कंपनीचा जवळपास 66 टक्के महसूल टेलिकॉम सेक्टरमधून येतो. या व्यतिरिक्त उर्वरीत महसूल रेल्वे आणि दुसऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून येतं. सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी हेड निराली शाह यांनी सांगितलं की, 'रेलटेल जर योग्यप्रकारे काम करत असेल तर देशात 5G च्या ग्रोथमुळे याला फायदा होईल. कारण कंपनीला फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचं काम मिळू शकतं. या व्यतिरिक्त रेल्वेच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या बाबतीतही रेलटेलची भूमिका अधिक चांगली आहे.' आयपीओबद्दल महत्वाच्या गोष्टी घ्या जाणून - - आयपीओचा प्राइस बँड 93-94 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. - आयपीओच्या अंतर्गत 8, 71, 53, 368 शेअर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जातील. - ऑफरद्वारे 819.24 कोटी रुपये उभे करण्याची सरकारची योजना आहे. - ऑफरची लॉट साइज 155 इक्विटी शेअर एवढी आहे. - या आयपीओमध्ये कमीतकमी 14,570 रुपये गुंतवावे लागतील. - गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट साइजसाठी बोली लावू शकतात. रेलटेल आयपीओ लॉट साइज - याचा एक लॉट 155 शेअर्सचा आहे. एक किरकोळ गुंतवणुकदार किमान 1 लॉटसाठी अर्ज करु शकतो. तर मोठे गुंतवणुकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. म्हणजे तुम्हाला या आयपीओमध्ये कमीत कमी 14,570 रुपये गुंतवावे लागतील.

(हे देखील वाचा - तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या गाडीला अपघात झाल्यास नियमानुसार हे असतात अधिकार; जाणून घ्या अशावेळी काय कराल )

कंपनीबद्दल घ्या जाणून - RailTel Corporation of India हा भारतीय रेल्वेचा एक उपक्रम आहे. ही कंपनी इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजीची पायाभूत सुविधा प्रदान करते. ही भारतातील सर्वांत मोठी न्यूट्रल टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली होती. कंपनीचं उदिष्ट्य रेल्वेचं नियंत्रण संचालन, सुरक्षा आणि देशभरामध्ये ब्रॉडबँड आणि मल्टी-मीडिया नेटवर्क सुविधा उपलब्ध करून अतिरिक्त उत्पन्न मिळवणं हे आहे. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित काम करते. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीला किती होता नफा - सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची एकूण मालमत्ता 2,482 कोटींच्या आसपास होती. याव्यतिरिक्त कंपनीचा महसूल 554 कोटी रुपये एवढा होता. कंपनीचा नफा सुमारे 46 कोटी रुपये होता.

(हे देखील वाचा - ऑनलाईन फ्रॉडवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना)

या वर्षातील सहावा आयपीओ असेल - वर्ष 2021 चा हा सहावा आयपीओ असेल. आतापर्यंत आयआरएफसी, इंडिगो पेंट्स, होम फर्स्ट फाइनान्स, स्टोव क्राफ्ट आणि ब्रूकफील्ड इंडिया रिअल एस्टेट ट्रस्टचे आयपीओ आले आहेत.
Published by:news18 desk
First published:

Tags: Business News, Central railway, Economy, India, Indian railway, IRCTC, Money

पुढील बातम्या