Elec-widget

असे व्हा श्रीमंत! एकेकाळी ते दुबईत घरोघरी जाऊन विकायचे औषधं,आता भारतात गुंतवणार 35 हजार कोटी

असे व्हा श्रीमंत! एकेकाळी ते दुबईत घरोघरी जाऊन विकायचे औषधं,आता भारतात गुंतवणार 35 हजार कोटी

कर्नाटकमधल्या उडपीमध्ये जन्मलेले बी. आर. शेट्टी यांचं सुरुवातीचं शिक्षण उडपीमध्येच झालं. आपल्या खिशामध्ये काही पैसे घेऊन ते वयाच्या 29 व्या वर्षी आपलं नशीब आजमावण्यासाठी दुबईला गेले. त्यांना तिथे नोकरी मिळवायची होती पण अनेक वर्षं त्यांना बेरोजगार राहावं लागलं होतं...

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : भारतातून दुबईमध्ये नोकरी करण्यासाठी गेलेले बी. आर. शेट्टी यांचं नाव आता दुबईमधल्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गणलं जातं. एकेकाळी ते दुबईमधल्या घरोघरी जाऊन औषधं विकायचे. आता ते भारतातल्या हेल्थकेअर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहेत.

तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हिंमतीच्या जोरावर चमत्कार घडवून दाखवू शकता, हेच बी. आर. शेट्टींच्या कहाणीतून दिसून येतं. मूळचे कर्नाटकचे असलेले बी. आर. शेट्टी यांनी दुबईमध्ये Finablr नावाची एक कंपनी सुरू केली आहे. ते आणखीही फार्मा आणि फायनान्शिअर सर्व्हिस कंपन्यांचे संस्थापक आहेत.

बेरोजगारीचाही अनुभव

कर्नाटकमधल्या उडपीमध्ये जन्मलेले बी. आर. शेट्टी यांचं सुरुवातीचं शिक्षण उडपीमध्येच झालं. आपल्या खिशामध्ये काही पैसे घेऊन ते वयाच्या 29 व्या वर्षी आपलं नशीब आजमावण्यासाठी दुबईला गेले. त्यांना तिथे नोकरी मिळवायची होती पण अनेक वर्षं त्यांना बेरोजगार राहावं लागलं होतं.

Loading...

या काळात त्यांनी घरोघरी जाऊन औषधं विकली. बरीच मेहनत केल्यानंतर त्यांना सेल्समनची नोकरी मिळाली. याच दिवसांत त्यांची संयुक्त अरब अमिरातमधल्या मोठमोठ्या डॉक्टरांशी त्यांची ओळख झाली.

आरोग्यसेवेचं विणलं जाळं

बी. आर. शेट्टी यांनी UAE मध्ये NMC Healthcare या कंपनीची स्थापना केली आहे. गेल्या 46 वर्षांत त्यांनी 17 देशांत हॉस्पिटल बांधली आहेत. त्याचबरोबर त्यांनी मेडिकल सेंटर्स, लाँग टर्म केअर फॅसिलिटी, डे सर्जरी सेंटर्स, फर्टिलिटी क्लिनिक्स, होम हेल्थ सर्व्हिस असा स्वरूपात आरोग्यसेवेचं जाळंही तयार केलं आहे.यूएईमधल्या भारतीयांना घरी पैसे पाठवण्यासाठी त्यांनी यूएई एक्सचेंज या कंपनीचीही सुरुवात केली.

खूशखबर! SBI होमलोन ग्राहकांना देणार भेट, EMI होऊ शकतो कमी

आता भारतामध्ये चांगल्या दर्जाची आणि सगळ्यांना परवडेल अशी आरोग्यसुविधा विकसित करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून भारतात हेल्थकेअरची एक साखळीच उभी राहील. पुढच्या 5 वर्षांत यातून जिल्हा रुग्णालयं आणि सामान्य रुग्णालयं बांधण्यात येतील.त्यांच्या या गुंतवणुकीतून दिल्ली, वाराणसी, हरिद्वार आणि बिहारमध्ये रुग्णालयं बांधण्यात येणार आहेत.

================================================================================================================

नाना पाटेकर यांनी घेतली अमित शहांची भेट, EXCLUCIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com