एका रात्रीत झाले पैसे दुप्पट, शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

एका रात्रीत झाले पैसे दुप्पट, शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

Money, Share Market, Business, Radhakishan Damani - व्यवस्थित प्लॅनिंग केलं की उद्योगधंदा मोठा होऊ शकतो. शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : कोणाचं नशीब कुठे चमकेल हे कुणीच सांगू शकणार नाही. अशीच एक गोष्ट आहे राधाकिशन दमानी यांची. तुमचा विश्वास बसणार नाही की त्यांची संपत्ती 24 तासात 100 टक्के वाढली. आज ते देशातल्या टाॅप श्रीमंतांमध्ये आहेत.

एका रात्रीत दुप्पट झाली संपत्ती

20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी फक्त एका रिटेल कंपनीचे मालक होते. पण 21 मार्चच्या सकाळी त्यांनी जशी बाॅम्बे स्टाॅक एस्कचेंजची घंटा वाजवली, तशी त्यांची संपत्ती 100 टक्के वाढली.

Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल?

21 मार्चच्या सकाळी जेव्हा राधाकिशन दमानी यांची कंपनी आयपीओ शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली, तेव्हा त्यांची संपत्ती गोदरेज परिवार आणि राहुल बजाज यांच्यापेक्षाही जास्त झाली होती. डिमार्टचा शेअर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला. तेव्हा इश्यू प्राइस 299 रुपये होता. हा 102 टक्के रिटर्न आहे. गेल्या 13 वर्षात लिस्टिंगच्या दिवशी कुठल्याही शेअरची किंमत इतकी वाढली नव्हती.

सुपरमार्केट रिटेल चेन D-Martचे मालक राधाकृष्णन दमानी यांनी हुरून इंडियाच्या श्रीमंत लोकांच्या यादीत आपली जागा निर्माण केलीय. अहवालात म्हटलंय, 62 वर्षांच्या रिटेल किंगच्या संपत्तीच सर्वात जास्त 321 टक्के तेजी आलीय.

'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

असा सुरू केला कारभार

सुरुवातीला दमानी यांनी बाॅल-बियरिंगचा उद्योगधंदा सुरू केला होता, पण त्यात नुकसान झाल्यानं तो बंद केला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासोबत स्टाॅक मार्केट ट्रेंडिंग सुरू केलं. नंतर चांगली संधी पाहून छोट्या कंपनीत गुंतवणूक सुरू केली. 1990पर्यंत त्यांनी गुंतवणूक करून कोटींनी कमाई केली होती. त्यानंतर त्यांनी रिटेलमध्ये उडी घ्यायचं ठरवलं आणि हळूहळू त्यांचा उद्योगधंदा वाढला.

फक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज

प्रसिद्धीपासून दूर राहिले

राधाकिशन दमानी नेहमीच प्रसिद्धीपासून लांब राहिलेत. ते नेहमी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. शेअर बाजारातल्या दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये ते  'मिस्टर व्‍हाइट अँड व्‍हाइट' नावानं ओळखले जातात.

दूरवरच्या गुंतवणुकीवर लक्ष

जगातले सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफेप्रमाणे दमानी एक व्ह्यॅल्यू इन्व्हेस्टर आहेत. ते जास्त काळाच्या गुंतवणूकीकडे लक्ष ठेवतात. त्यांनी कुठलाही शाॅर्टकट न वापरता डी मार्ट सुरू केलं. त्यांनी सुरुवात छोटी केली आणि हळूहळू व्यवसाय वाढवला.  15 वर्ष डी मार्ट फायद्यातच आहे.

क्रेडिट घेणं टाळलं

उद्योगधंद्यात क्रेडिट घेणं आणि त्याची उशिरा भरपाई करणं धोक्याचं असतं. म्हणून दमानी यांनी कधी क्रेडिट घेतलं नाही.

स्वस्त खरेदी आणि कमी किमतीत विक्री

दमानी यांनी ग्राहकांना रोज लागणाऱ्या वस्तूंवर मोठी सवलत दिली. ते पुरवठादार आणि विक्रेता यांना एक दिवसाच्या आत रक्कम देतात. म्हणून हे लोक त्यांना स्वस्त दरात माल उपलब्ध करून देतात.

VIDEO: सत्ता असूनही सेनेचा मोर्चा; विरोधकांचा हल्लाबोल, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 17, 2019, 3:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading