नोकरी सोडा, सुरू करा हा बिझनेस; रोज कमवाल 4000 रुपये!

नोकरी सोडा, सुरू करा हा बिझनेस; रोज कमवाल 4000 रुपये!

करोनाच्या काळात (Coronavirus Pandemic) अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची (Recession) वेळ आली आहे. मात्र थोडंसं धाडस दाखवलं तर तुम्ही नोकरीपेक्षाही जास्त पैसे मिळवून देणारा बिझनेस सुरू करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : बऱ्याच लोकांना नोकरीहून (job) अधिक बिजनेसमध्ये रस असतो. मात्र योग्य वेळी योग्य माहिती मिळत नाही. कोरोनाकाळात (Corona times) हजारो लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आल्याने आता तर बिजनेसचं (business) महत्त्व अजूनच वाढलंय. इथं अशाच एका बिजनेसबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो आहोत.

हा बिजनेस आहे केळ्यांचे चिप्स बनवण्याचा बिझनेस! हा बिजनेस सुरू करून तुम्ही रोज 4000 रुपये कमावू शकता. म्हणजे महिन्याला होतात तब्बल एक लाख रुपये!

केळ्यांचे चिप्स आरोग्यासाठी चांगले असतात. सोबतच ते उपवासालाही चालतात. आता केळ्यांचे चिप्स हे बटाट्याच्या चिप्सहून जास्त लोकप्रिय होत आहेत. म्हणून त्यांची मागणीही वाढलीय.

केळ्यांच्या चिप्सचा बाजार आकारानं लहान आहे. त्यामुळं साहजिकच मोठ्या ब्रॅण्डच्या कंपन्या हे चिप्स बनवत नाहीत. हेच कारण आहे, की केळ्यांचे चिप्स बनवायला जास्त संधी आहेत. आता आपण संवत्सर पाहू की तुम्ही हा बिजनेस कसा सुरू करू शकता.

यासाठी पाहिजे हे साहित्य

केळ्यांचे चिप्स बनवायला वेगवेगळी यंत्रसामग्री लागते. कच्चा माल म्हणून मुख्यतः कच्ची केळी, मीठ, खाण्याचं तेल आणि काही मसाले लागतात. काही प्रमुख यंत्रांची यादी अशी आहे -

केळ्यांना धुवायचा टॅंक आणि केळी छिलण्याचं यंत्र

केळ्यांना पातळ तुकड्यात कापण्याचं यंत्र

तुकड्यांना फ्राय करण्याचं यंत्र

मसाले मिसळण्याचं यंत्र

पाऊच प्रिंट करण्याचं यंत्र

प्रयोगशाळा उपकरणं

ही यंत्रसामग्री कुठं मिळेल?

https://www.indiamart.com/ किंवा  https://india.alibaba.com/index.html वरून तुम्ही ही यंत्रसामग्री मागवू शकता. ही यंत्रं ठेवायला तुम्हाला किमान 4000 ते 5000 स्केअर फीट जागेची गरज असेल. ही यंत्रं तुम्हाला 28 हजार ते 50 हजारात मिळतील.

50 किलो चिप्स बनवण्यासाठीचा खर्च

50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी 120 किलो कच्ची केळी लागतात. या केळी तुम्हाला 1000 रुपयांमध्ये मिळतील. यासोबतच 12 ते 15 लिटर तेल लागणार आहे. 15 लिटर तेल 70 रुपयांप्रमाणे 1050 रुपयांचं होईल. चिप्स फ्राय करणारी मशीन एका तासात 10 ते 11 लीटर डिझेल घेते. 1 लिटर डिझेल 80 रुपयांप्रमाणे 11 लिटरचे होतात 900 रुपये. मीठ आणि मसाल्यांचे जास्तीत जास्त 150 रुपये. 3200 रुपयांत ५० किलो चिप्स बनून तयार होतील. म्हणजे एक किलो चिप्सच्या पॅकेटचं पॅकिंग कॉस्ट असेल ७० रुपये. या पॅकेटला तुम्ही किराणा दुकानावर सहज 90 ते 100 रुपयात विकू शकता.

Published by: News18 Desk
First published: December 25, 2020, 2:19 PM IST

ताज्या बातम्या