Home /News /money /

PVR-INOX Leisure यांचे विलीनीकरण; 1500 स्क्रीन्ससह देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन बनणार

PVR-INOX Leisure यांचे विलीनीकरण; 1500 स्क्रीन्ससह देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन बनणार

PVR ही देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन असून देशभरात एकूण 860 स्क्रीन आहेत. त्याच वेळी, INOX Leisure मध्ये एकूण 667 स्क्रीन आहेत. तर सिनेपोलिसचे एकूण 400 स्क्रीन्स आहेत.

    मुंबई, 27 मार्च : देशातील दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेन PVR आणि INOX Leisure यांचे विलीनीकरण झाले आहे. या प्रस्तावाला दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणानंतर 1,500 स्क्रीनची सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन देशात अस्तित्वात येईल, असे नियामक माहितीत म्हटले आहे. नियामक माहितीनुसार, PVR चे CMD अजय बिजली यांची संयुक्त कंपनीचे MD म्हणून नियुक्ती केली जाईल आणि संजीव कुमार कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. आयनॉक्स समूहाचे चेअरमन पवन कुमार जैन यांची बोर्डाच्या नॉन एक्झिक्युटिव्ह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. सिद्धार्थ जैन संयुक्त कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन-इंडिपेंडंट संचालक म्हणून काम करतील. कोणाकडे काय क्षमता आहेत? PVR ही देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन असून देशभरात एकूण 860 स्क्रीन आहेत. त्याच वेळी, INOX Leisure मध्ये एकूण 667 स्क्रीन आहेत. तर सिनेपोलिसचे एकूण 400 स्क्रीन्स आहेत. या कंपनीचे मुख्यालय मेक्सिकोमध्ये आहे. कोणत्या कंपनीवर किती कर्ज आहे? 31 डिसेंबर 2021 पर्यंत, PVR चे एकूण कर्ज 1,536 कोटी रुपये आणि रोख 678 कोटी रुपये होते. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. या काळात पीव्हीआरचे उत्पन्न 3,452 कोटी रुपयांवरून 310 कोटी रुपयांवर आले. कोरोनाच्या संसर्गामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. PVR आणि INOX Leisure च्या विलीनीकरणामुळे कंपनी खूप मोठी होईल. त्याची मार्केट कॅप 16,000 कोटी रुपयांच्या जवळपास असू शकते. शुक्रवारी, INOX Leisure चे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढून 470 प्रति शेअर वर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 5,700 कोटी रुपये होती. दुसरीकडे, पीव्हीआरचे शेअर्स 1.55 टक्क्यांनी वाढून 1804 रुपयांवर बंद झाले. त्याचे मार्केट कॅप 11,100 कोटी रुपयांवर बंद झाले. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या काळात अनेक महिने थिएटर बंद होती. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना चांगलाच फटका बसला. हे दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाचे प्रमुख कारण आहे. OTT प्लॅटफॉर्मवरून होणाऱ्या तीव्र स्पर्धेमुळे थिएटर व्यवसायाला फटका बसला आहे. या विलीनीकरणाचा अर्थ असा आहे की पीव्हीआर आणि सिनेपोलिसचे विलीनीकरण काही काळासाठी पुढे ढकलले जाऊ शकते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Money

    पुढील बातम्या