मुंबई, 07 जानेवारी: तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने त्यांच्या खातेधारकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने काही सेवांचे शुल्क वाढवले आहे. पीएनबीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार हे नवीन शुल्क 15 जानेवारीपासून लागू होणार आहे. मेट्रो शहरात ग्राहकांच्या खात्यामध्ये क्वार्टर्ली मिनिमम बॅलेन्सची सध्याची कमीतकमी मर्यादा 5000 रुपये आहे, ती वाढवू 10000 रुपये करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
किमान शिल्लक नसल्यास किती शुल्क आकारले जाईल?
>> शहरी आणि मेट्रो भागात 10 हजारांपेक्षा कमी शिल्लक असल्यास 600 रुपये शुल्क लागू होईल. आत्तापर्यंत हे शुल्क 300 रुपये होते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की हे शुल्क तिमाहीने घेतले जाईल
हे वाचा-तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा 'असा' करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये
>> ग्रामीण आणि निमशहरी भागात किमान शिल्लक न ठेवल्यास 400 रुपये प्रति तिमाही शुल्क आकारण्यात येईल, जे की आधी 200 रुपये होते. दरम्यान बँकेने ग्रामीण आणि निमशहरी किमान शिल्लक मर्यादा 1000 रुपये ठेवली आहे.
लॉकर चार्ज मध्ये बदल
>> एक्स्ट्रा लार्ज आकाराचे लॉकर वगळता सर्व क्षेत्रांसाठी आणि सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे.
>> शहरी आणि मेट्रो भागात लॉकरच्या शुल्कात 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
>> छोट्या आकाराच्या लॉकरचे शुल्क पूर्वी ग्रामीण भागात एक हजार रुपये होते, ते आता 1,250 रुपये केले जाणार आहे. तर शहरी भागात हे शुल्क 1,500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.
हे वाचा-Just Dial वरुन काढायचे ग्राहकाची माहिती, SBI अधिकारी बनून 200 जणांना लुटलं!
>> मध्यम आकाराच्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागात 2 हजार रुपयांवरून 2,500 रुपये आणि शहरी भागात 3 हजार रुपयांवरून 3,500 रुपये झाले आहे.
>> मोठ्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागात 2,500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आले आहे. तर शहरी भागात ते 5 हजारांवरून 5,500 रुपयांपर्यंत वाढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.