मराठी बातम्या /बातम्या /मनी /ही सरकारी बँक आज देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी, वाचा कशाप्रकारे कराल अर्ज?

ही सरकारी बँक आज देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी, वाचा कशाप्रकारे कराल अर्ज?

पंजाब नॅशनल बँकेकडून (Punjab National Bank) मेगा ई-ऑक्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. आज 24 जून रोजी बँकेकडून ई-लिलाव केला जाणार आहे

पंजाब नॅशनल बँकेकडून (Punjab National Bank) मेगा ई-ऑक्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. आज 24 जून रोजी बँकेकडून ई-लिलाव केला जाणार आहे

पंजाब नॅशनल बँकेकडून (Punjab National Bank) मेगा ई-ऑक्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. आज 24 जून रोजी बँकेकडून ई-लिलाव केला जाणार आहे

नवी दिल्ली, 24 जून: स्वत:चं घर खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा बजेटचा विचार करता ते स्वप्न मागे पडतं. पण जर अशी संधी मिळाली की ज्यात तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करता येईल तर? जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या पीएनबीने (PNB) खास ऑफर आणली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून मेगा ई-ऑक्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. आज 24 जून रोजी बँकेकडून ई-लिलाव केला जाणार आहे. यात गुंतवणुकदारांना रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अ‍ॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

सध्या बँक 13014 रेसिडेंशियल प्रापर्टीचा (residential properties) लिलाव करत आहे. त्याशिवाय 2796 कमर्शियल प्रापर्टी (commercial properties), 1373 इंडस्ट्रियल प्रापर्टी, 104 अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टी आहेत. या सर्व प्रापर्टीचा लिलाव बँकेकडून केला जाईल.

हे वाचा-Gold Price: खूशखबर! सोन्याचांदीची झळाळी उतरली, खरेदीआधी इथे तपासा लेटेस्ट दर

पीएनबीने केलं आहे ट्वीट

पीएनबीने त्यांच्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुमचं कॅलेंडर मार्क करा! निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता उचित शुल्क देऊन मिळविण्यासाठी पीएनबीच्या मेगा ई-लिलावात भाग घ्या. याशिवाय अधिक माहितीसाठी ई-विक्री पोर्टलला भेट द्या- https://ibapi.in

बोली लावण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील या अटी

-बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

-त्यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो.

-त्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो.

हे वाचा-जुलैमध्ये 15 दिवस बंद राहतील बँका, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी

-इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात.

बँकेकडून विविध वेळी केला जातो लिलाव

ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.

प्रापर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता. E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेता येईल.

First published:

Tags: Home Loan, Investment, Pnb