मराठी बातम्या /बातम्या /मनी /PNB Alert! खातं सुरक्षित राहण्यासाठी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, तुमचे पैसे लंपास होण्याची भीती

PNB Alert! खातं सुरक्षित राहण्यासाठी चुकूनही करू नका 'या' गोष्टी, तुमचे पैसे लंपास होण्याची भीती

PNB  Bank Alert!

PNB Bank Alert!

गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकांकडून अशा सूचना जाहीर केल्या जात आहेत. सायबर (Cyber Attack) हल्ल्याची शक्यता असल्याने या अगोदर भारत सरकारकडूनही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, दि 17 एप्रिल : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना फसवणूक होऊ नये, यासाठी अलर्ट राहण्यास सांगितले आहे. देशभरातील जवळपास सर्वच बँका फसवणूक टाळण्यासाठी आपल्या ग्राहकांना अलर्ट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकांकडून अशा सूचना जाहीर केल्या जात आहेत. सायबर (Cyber Attack) हल्ल्याची शक्यता असल्याने या अगोदर भारत सरकारकडूनही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.

पंजाब नॅशनल बँकेकडून ट्विटरद्वारे बरीच माहिती देण्यात येत असते. ग्राहकांनी फिशिंगपासून (Phishing) सावध राहावे, असे ट्वीट करून सांगण्यात आले आहे. एखादी छोटीशी चूकही तुमचे पूर्ण खाते रिकामे करू शकते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून (Banking Frauds) आपण कसे सुरक्षित राहावे यासाठी बँकेकडून काही उपायही सुचवले आहेत.

(हे  वाचा - 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य)

फसवणूक करणाऱ्या फोन कॉल्सपासून सावध राहण्यासाठी यापूर्वीही बँकेने ग्राहकांना जागरूक केले होते. आपल्या खात्यासंबंधीची कोणतीही माहिती इतरांना देऊ नये. अनेकदा अनोळखी क्रमांकावरून कॉल केले जातात आणि बँक खाते नंबर, एटीएम नंबर किंवा पिन नंबर याची बँकेला गरज आहे किंवा तुमचे खाते बंद होणार आहे, असे सांगून तुमची खात्यासंदर्भातील खासगी माहिती मागवली जाते आणि त्यामुळे फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यासाठी बँकेने वारंवार सांगितले आहे की, बँक कर्मचारी अशाप्रकारे कधीही माहिती मागवत नाहीत, खात्या संदर्भात काही काम असेल तर शाखेशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते. त्यामुळे नागरिकांनी फोनवरून कोणालाही बँक खात्याविषयी गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणूक कशी टाळायची

1. ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, यूपीआय पिन कोणालाही शेअर करू नका.

2. कधीही फोनमध्ये बँकिंग माहिती सेव्ह करू नका.

4. एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका.

5. बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

(हे वाचा - जगाला Corona Vaccine चा पुरवठा करणाऱ्या भारतावर का आली लस आयात करण्याची वेळ? वाचा कारण)

6. ऑनलाइन पेमेंटमध्ये खबरदारी घ्यावी

7. खात्री न करता सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका

8. अज्ञात मेसेजद्वारे येणाऱ्या लिंकवर क्लीक करू नका

9. स्पायवेअर टाळा

First published:

Tags: Personal banking, Pnb, Pnb bank