या सरकारी बँकेच्या नेट बँकिंगमध्ये गोंधळ, ग्राहकांच्या विविध तक्रारी; पैसे ट्रान्सफर करण्याआधी वाचा बँकेने काय म्हटलं

या सरकारी बँकेच्या नेट बँकिंगमध्ये गोंधळ, ग्राहकांच्या विविध तक्रारी; पैसे ट्रान्सफर करण्याआधी वाचा बँकेने काय म्हटलं

तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आबे. PNB ने ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग (Online Banking)संदर्भात महत्त्वाचा संदेश दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. PNB ने ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग (Online Banking) संदर्भात महत्त्वाचा संदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे इंटरनेट बँकिंग, बँकेचं App, UPI च्या माध्यमातून व्यवहार इ. बाबत ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक ग्राहकांनी ट्विटर द्वारे त्यांच्या समस्याही मांडल्या आहेत. बँकेकडून त्यांच्या शंकांचं निरसन करण्याच प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान कोरोना काळात (Coronavirus) विविध बँकांनी त्यांच्या ग्राहकांना घरातून अधिकतर कामं करता यावी अशी सुविधा उपबल्ध करून दिली आहे. PNB ने देखील अशा काही इंटरनेट सेवा उपलब्ध केल्या आहेत.

तांत्रिक कारणामुळे वाढतायंत अडचणी

PNB च्या ग्राहकांनी तक्रार करण्यासंदर्भात केलेल्या ट्वीटनंतर बँकेने त्यांच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने तांत्रिक कारणामुळे अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. एका ग्राहकाने ट्रान्झॅक्शन संदर्भात तक्रार केल्यानंतर बँकेने त्यावर रिप्लाय देत ग्राहकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तक्रारींचे काही मेसेज PNB कडे येत आहेत. अशावेळी तुम्ही देखील ग्राहक असाल तर तुमच्या तक्रारी ट्विटर हँडलवरुन मांडू शकता.

शिवाय बँकेने तुमच्या वैयक्तिक तपशीलाचा दुरुपयोग टाळण्यासाठी खात्यासंदर्भात कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे. तक्रार पोर्टलवरच करण्याचं आवाहन बँकेने केले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 15, 2021, 5:03 PM IST

ताज्या बातम्या