मराठी बातम्या /बातम्या /मनी /स्वस्तात घर, प्रॉपर्टी खरेदीची संधी; PNB कडून 14300 मालमत्तांचा होणार लिलाव

स्वस्तात घर, प्रॉपर्टी खरेदीची संधी; PNB कडून 14300 मालमत्तांचा होणार लिलाव

 पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

PNB E-Auction: 25 ऑगस्ट 2022 रोजी स्वस्त घर किंवा जमिनीसाठी बोली लावता येणार आहे. लिलाव SARFAESI कायद्यांतर्गत केला जाईल, त्यामुळे तो पूर्णपणे पारदर्शक असेल.

मुंबई, 22 ऑगस्ट : घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे नवीन घर घेणे अनेकांसाठी अवघड बनलं आहे. त्यामुळे स्वस्त घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB स्वस्त घर खरेदीची संधी उपलब्ध केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने एक मेगा ई-लिलाव आयोजित करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला निवासी, व्यावसायिक आणि शेतजमीन खरेदी करण्याची संधी मिळेल.

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. PNB ने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं की, जर तुम्ही परवडणारी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

25 ऑगस्ट 2022 रोजी स्वस्त घर किंवा जमिनीसाठी बोली लावता येणार आहे. लिलाव SARFAESI कायद्यांतर्गत केला जाईल, त्यामुळे तो पूर्णपणे पारदर्शक असेल.

14308 मालमत्तांचा लिलाव

PNB च्या या लिलावात 14308 निवासी मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यात 2682 व्यावसायिक मालमत्तांचा लिलाव होणार आहे. तर औद्योगिक मालमत्तांची संख्या 1468 आहे. त्याच वेळी, 107 कृषी मालमत्ता आहेत, ज्यासाठी तुम्ही बोली लावू शकता. या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला लिलावाची संपूर्ण माहिती मिळेल.

First published:
top videos

    Tags: Pnb bank