News18 Lokmat

Alert : 30 एप्रिलला मोठी सरकारी बँक बंद करणार ही खास सुविधा

ही बँक ई वॉलेटशी संबंधित एक खास सुविधा येत्या 30 तारखेपासून बंद करणार आहे. त्यामुळे यातले पैसे तातडीने काढून घ्या, असं आवाहन बँकेनं केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 09:56 PM IST

Alert : 30 एप्रिलला मोठी सरकारी बँक बंद करणार ही खास सुविधा

नवी दिल्ली, 24 एप्रिल : पंजाब नॅशनल बँक ही देशातली महत्त्वाची राष्ट्रीयीकृत बँक आहे. पीएनबीने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. ही बँक ई वॉलेटशी संबंधित एक खास सुविधा येत्या 30 तारखेपासून बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवेमध्ये पैसे गुंतवलेल्या ग्राहकांन तातडीने पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं हिताचं आहे.

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगसारखी पीएनबीने आपल्या ग्राहकांसाठी PNB Kitty ही सेवा सुरू केली होती. ही सेवा म्हणजे एक प्रकारचे ऑनलाईन वॉलेट आहे. डिसेंबर 2016 पासून पीएनबी किटी ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पीएनबी किटीच्या माध्यमातून ग्राहक व्यवहार करू शकतात.ग्राहकांनी काय करायचं?

Loading...

पण आता ही सुविधा बँक महिनाअखेरीपासून बंद करणार आहे. बँकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, PNB kitty वॉलेटमधला बॅलन्स शून्य होत नाही, तोपर्यंत युजर्स त्यातल्या रकमेचा वापर करू शकतात. IMPS च्या माध्यमातून या किटी वॉलेटमधले पैसे अन्य अकाउंटला ट्रान्सफर करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.काय होती सुविधा

पीएनबीची किटी वॉलेट सुविधा सुरक्षित समजली जायची. कारण या सुविधेद्वारे व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसारखा पासवर्ड द्यायची आवश्यकता नाही. एका किटीमधून दुसऱ्या किटीमध्ये पैसे पाठवण्यासाठी फक्त मोबाईल नंबरची आवश्यकता असते.

पीएनबी किटी ही सुविधा एका अॅपच्या माध्यमातून दिली जात होती. ही ई वॉलेट सुविधा बंद करण्यात येणार असल्याचं बँकेनं ग्राहकांना कळवलं आहे. 30 एप्रिल पर्यंत ई वॉलेटमधले आपापले  पैसे काढून घ्या, असं आवाहनही बँकेनं केलं आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...