सुमित सोनवणे, प्रतिनिधी, दौंड : शेतकऱ्यांच्या मागची संकटं काही केल्या संपेना झाली आहे. आधी कोरोना नंतर अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारं पिकाचं नुकसान अशा एक ना अनेक संकटातून शेतकरी जरा कुठे सावरतो तोच पुन्हा एक नवं संकट शेतकऱ्यासमोर उभं ठाकलेलं असतं. आता ढगाळ हवामानाचा फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.
ढगाळ हवामानामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आंबा काजूला येणारा मोहरही यंदा उशिराने आला आहे. या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना बसला. थंडीत अंजीर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येतात. अंजीरला चांगली मागणी देखील मिळते, मात्र यंदाची स्थिती काहीशी निराशाजनकच आहे.
Farmer Success Story : शेती मातीशी नाळ असलेल्या तरूणाची उंच भरारी, महिन्याला कमवतो तब्बल एक लाख
दौंड तालुक्यातील खोर गावात अंजीराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. जवळपास ६० हेक्टर इतके क्षेत्र हे अंजीर बागेचे खोरच्या परिसरात घेतले गेले आहे. मात्र सद्या सुरु असलेल्या ढगाळ, रोगट हवामानाचा मोठा फटका या अंजीरच्या फळाला बसत आहे.
ढगाळ हवामाना मुळे अंजीर फळं हे उकलत असून गोडी देखील कमी होत आहे. अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघले जात आहे. परिणामी अंजीर उकलले गेल्याने बाजारभावात देखील कमालीची घसरण झाली आहे. सद्या ३० ते ३५ रुपये प्रती किलो दराने अंजीर व्यापारी वर्गाच्या माध्यमातून जात आहे.
वटवाघळं करत होते द्राक्षाचं नुकसान, शेतकऱ्याने अशी घडवली अद्दल पाहा PHOTO
ढगाळ हवामानाचा फटका हा अंजीराच्या पानावर देखील बसला जात असून करपा जातीचा रोग या पानावर पडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान ह्या रोगट ढगाळ हवामानामुळे होत आहे.
हवेमध्ये अद्रता वाढल्याने अंजीर तडकले जात आहे. आणी पाऊस होऊन गेल्यावर थंड हवा सुटली की पानगळ होऊन करपा जातीचा रोग पडला जात आहे. एकंदरीतच या भागातील शेतकरी वर्गाची अंजीर पिकाचा पिक विम्यात समावेश करण्याची मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Pune