पुण्यात 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला मुलगा, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल

पुण्यात 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला मुलगा, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल

गावात असलेली ही बोअरवेल 200 फूट खोल आहे. मुलाला वाचवण्यासाठी पोलिस आणि बचाब पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • Share this:

पुणे, 20 फेब्रुवारी : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात एक मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेगावच्या जाधववाडी येथे 6 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे. गावात असलेली ही बोअरवेल 200 फूट खोल आहे. मुलाला वाचवण्यासाठी पोलिस आणि बचाब पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

200 फुट खोल या बोअरवेलमध्ये हा मुलगा फक्त 10 फूट खोलीवर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुलाला वाचवण्यासाठी NDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खेळताना मुलगा बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. रवि पंडीत मिल असं मुलाचे नाव आहे. रवि मुळचा शेगावचा असल्याची माहिती आहे. रविचे आई वडील करतात रस्त्यावर मजुरीचे काम करतात.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या