9 महिन्यात 18 सरकारी बँकांना फसवणुकीने बुडवलं, 1.17 लाख कोटींचा दणका

धक्कादायक, सरकारी बँकेमध्ये एकूण 8 हजार 926 फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं झाल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक, सरकारी बँकेमध्ये एकूण 8 हजार 926 फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहीच्या काळात 18 सरकारी बँकेमध्ये एकूण 8 हजार 926 फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तब्बल 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. यामध्ये सर्वात मोठा झटका भारतीय स्टेट बँकेला बसला आहे. माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं उत्तर दिलं आहे. यामध्ये एसबीआय बँकेत फसवणुकीची एकूण 4 हजार 769 प्रकरणे असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये बँकेला तब्बल 30 हजार 300 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. हा आकडा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहीमधील आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील ही आकडेवारी आहे. एकूण फसवणूक झालेल्या रकमेपैकी 26 टक्के वाटा एकट्या एसबीआयचा आहे. यानंतर पंजाब नॅशनल बँकेत 294 प्रकरणं समोर आली आहेत. यामुळे बँकेला 14 हजार 928 कोटींचे नुकसान झालं आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 250 फसवणुकीच्या तक्रारी असून यात 11 हजार 166 कोटींचा फटका बँकेला बसला आहे. अलहाबाद बँकेमध्ये फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या 860 आहे. यातून बँकेला 6 हजार 781 कोटींचे नुकसान झाले आहे. तर बँक ऑफ इंडियामध्ये 161 फसवणुकीची प्रकरणे असून यातून 6 हजार 621 कोटींचा दणका बसला आहे. यूनियन बँक ऑफ इंडियालसुद्धा फसवणुकीचा दणका बसला आहे. त्यांना 292 फसवणुकीच्या प्रकऱणांमुळे 5 हजार 604 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत फसवणुकीची 151 प्रकरणं आहेत. यात बँकेचे 5 हजार 556 कोटी रुपये अडकले आहेत. तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला अशा फसवणुकीमुळे 4 हजार 899 कोटी रुपयांचा दणका बसला आहे. 'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज याशिवाय कॅनरा बँक, युको बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांचीही फसवणूक झाली आहे. या बँकांचे मिळून एकूण 31 हजार 600 कोटींचे नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. फसवणुकीत किती नुकसान झालं याची माहिती मिळाली असली तरी कशा प्रकारे फसवणुक झाली हे मात्र समजले नाही. RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस
    First published: