मराठी बातम्या /बातम्या /मनी /Public Provident Fund: कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक आवश्यक, PPF Account संबंधित 10 महत्त्वाचे मुद्दे

Public Provident Fund: कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक आवश्यक, PPF Account संबंधित 10 महत्त्वाचे मुद्दे

PPF मध्ये गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त आहे. जाणून घ्या PPF संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे...

PPF मध्ये गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त आहे. जाणून घ्या PPF संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे...

PPF मध्ये गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त आहे. जाणून घ्या PPF संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे...

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक सरकारी टॅक्स सेव्हिंग योजना आहे, जी गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीदरम्यान एक फंड उभारण्यास आणि दरवर्षी आयकर वाचवण्यासाठी मदत करते. PPF मध्ये गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त आहे. जाणून घ्या PPF संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे...

1. PPF व्याज दर: PPF वरील व्याज दर सध्या 7.10 टक्के आहे. PPF व्याज दर मासिक आधारावर मोजला जातो, पण व्याजदर वार्षिक जोडला जातो.

2. PPF व्याज कॅल्क्युलेटर: PPF व्याज महिन्याच्या 5 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत PPF खात्यात उपलब्ध असलेल्या किमान शिल्लक रकमेवर दिले जाते. त्यामुळे, जर एखाद्या PPF खातेधारकाने महिन्याच्या 1 ते 4 तारखेदरम्यान पैसे जमा केले, तर गुंतवणूकदार त्या महिन्यासाठी PPF व्याजासाठी पात्र असेल. म्हणून, PPF गुंतवणूकदारांना महिन्याच्या 1 ते 4 तारखेदरम्यान पैसे जमा करण्याचा सल्ला दिला जातो.

3. PPF डिपॉझिट: PPF खातेधारकाने त्याचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा केले पाहिजेत. शिवाय जर त्याने आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर अतिरिक्त रकमेवर कोणतेही व्याज नाही.

हे वाचा-तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

4. PPF खाते नियम: एखादी व्यक्ती फक्त एक PPF खाते उघडू शकते आणि PPF खात्याच्या बाबतीत संयुक्त खात्याला परवानगी नाही.

5. पीपीएफ पैसे काढण्याचे नियम: 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मॅच्युरिटीवर पीपीएफ खातेधारक संपूर्ण रक्कम काढू शकतो. आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत, योजनेच्या खात्याची 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. पीपीएफ खाते उघडल्यानंतर 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे.

6. इन्कम टॅक्स बेनिफिट्स: वर नमूद केल्याप्रमाणे, PPF खात्यात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सूट मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 80C मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीपीएफ मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.

7. PPF खाते कसे सक्रिय करावे: आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करण्यात अयशस्वी झाल्यास PPF खाते फ्रीज होते. ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, वार्षिक 50 रुपये दंड भरावा लागेल.

हे वाचा-सामान्यांना मोठा दिलासा! उतरल्या खाद्यतेलाच्या किमती, 1 लीटर तेलाचा आहे हा दर

8. सिक्योरिटी अगेन्स्ट बँकरप्सी: पीपीएफ खाते कोणत्याही व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी अॅटॅच केले जाऊ शकत नाही, अगदी न्यायालयाच्या आदेशानेही नाही.

9. PPF खाते एक्सटेंन्शन: 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, खातेदार PPF खाते 5-5  वर्षांनी वाढवता येईल.

10. PPF वर कर्ज: खातेदार खाते उघडण्याच्या 3 ते 5 व्या वर्षाच्या दरम्यान PPF खात्यावर कर्ज घेण्यास पात्र आहे. कर्जाची रक्कम कर्जासाठी अर्ज करण्याच्या आधीच्या वर्षाच्या जास्तीत जास्त 25% असू शकते.

First published:
top videos

    Tags: Open ppf account, PPF