नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (Public Investment Fund - PIF) 1.3 बिलियन डॉलर अर्थात 9,555 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं, रिलायन्स इंडस्ट्रीजने (reliance industries) गुरूवारी जाहीर केलं. 2.04 टक्के भागभांडवलासाठी PIF ने गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडचे (Reliance Retail Ventures Limited - RRVL) प्री-मनी इक्विटी मूल्य 4.587 लाख कोटी रुपये इतके आहे.
रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधील गुंतवणूक, पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडच्या पूर्वीच्या जीओ प्लॅटफॉर्ममधील 2.32 टक्के भागीदारीनंतर झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंत रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये एकत्रितपणे 47,265 कोटी रुपयांत 10.9 टक्क्यांची विक्री केली आहे.
#BreakingNews | Reliance Retail में Public Investment Fund ने ₹9555 Cr का निवेश किया#RelianceIndustries pic.twitter.com/cA3vSqdVmI
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) November 5, 2020
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी, रिलायन्स रिटेलमधील मूल्यवान भागीदारीसाठी पीआयएफचं स्वागत केलं आहे. तसंच त्यांच्या मदतीच्या, मार्गदर्शनाच्या अपेक्षेसह लहान व्यापाऱ्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी भारताच्या रिटेल क्षेत्राचा कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास असाच पुढे सुरू ठेवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Reliance Industries, Reliance Industries Limited