Home /News /money /

PF खातेधारक असाल तर 'या' पद्धतीने करा KYC अपडेट, पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे हे काम

PF खातेधारक असाल तर 'या' पद्धतीने करा KYC अपडेट, पैसे काढण्यासाठी आवश्यक आहे हे काम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employee Provident Fund Organization) संपूर्ण प्रक्रियेविषयी नोकरदार वर्गाला माहित असणे आवश्यक आहे. केवायसी अपडेट करणे ही त्यातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे

    मुंबई, 20 ऑक्टोबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employee Provident Fund Organization) संपूर्ण प्रक्रियेविषयी नोकरदार वर्गाला माहित  असणे आवश्यक आहे. पूर्ण माहिती नसल्याने अनेकांना आपला हक्काचा PF काढण्यात अडचणी येतात. पण एकदा तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याचं केवायसी करून घेतल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. केवायसी केल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यामधील व्यवहार आणि पासबुक ऑनलाईन पाहू शकता. ही प्रोसेस तुम्ही EPFO च्या Unified Portal  वरून करू शकणार आहात. पण यासाठी तुमचं केवायसी आणि UAN  क्रमांक अॅक्टिव्हेट असायला हवा. सध्या कंपनीच्या अटेस्टेशनशिवाय कर्मचारी तीन पद्धतीने आपला अर्ज करू शकतो. यामध्ये Form-19, 10C आणि 31 या तीन पद्धतीचे क्लेम करू शकतात.  त्यासाठीही तुमचा UAN  क्रमांक सक्रीय असायला हवा. त्याचबरोबर किमान आधारकार्ड आणि बँक खात्याची केवायसी देखील झालेली असायला हवी. तसंचकंपनीने तुमचे खाते डिजिटल सहीच्या मदतीने खातरजमा देखील केलेले असावे. काय आहे केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत? -यासाठी तुम्हाला सर्वात आधी पोर्टलवर जाऊन केवायसीचा पर्याय निवडावा लागेल. -तिथे पॅन क्रमांक(PAN Card No., आधार क्रमांक (Aadhar) मोबाईल क्रमांक, बँक खाते याची माहिती भरा. -यानंतर तुमचे पॅन आणि आधार तुमच्या पीएफ खात्याशी संलग्न होईल. (हे वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला) -संबंधित माहिती नोकरी देणाऱ्या कंपनीकडून तपासून व्हेरिफाय होणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर कंपनीने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी खात्याचा वापर सहजरित्या करू शकता. -यासाठी सर्व पद्धत ऑनलाईन असून तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर उमंग App च्या माध्यमातून देखील तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याची केवायसी करू शकता. (हे वाचा-Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीचे दरही उतरले) त्यानंतर तुम्ही महिन्याला तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होते हे ऑनलाईन UAN portal वर पाहू शकता. त्याचबरोबर एकदा केवायसी झाल्यानंतर तुम्ही कंपनीच्या परवानगीशिवाय तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता. केवायसीमध्ये पॅनकार्ड क्रमांकाला खूप महत्त्व आहे. तुम्ही पॅन कार्ड PF खात्याला जोडला असेल आणि जर तुमच्या PF खात्यात 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम असेल त्याचबरोबर तुम्हाला नोकरी लागून 5 वर्षं पूर्ण झाली नसतील तर तुम्हाला 10 टक्के TDS  भरावा लागतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal

    पुढील बातम्या