नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, आता तुमच्या हातात येऊ शकतो जास्त पगार

नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, आता तुमच्या हातात येऊ शकतो जास्त पगार

आता कर्मचारी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून कमी पैसे कापले जाण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे आता प्रॉव्हिडंट फंडासाठी पगाराच्या 12 टक्क्यांपेक्षाही कमी पैसे देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांकडे असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : सरकार या आठवड्यात सोशल सिक्युरिटी कोड 2019 संसदेत सादर करू शकतं. या विधयेकात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता कर्मचारी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून कमी पैसे कापले जाण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे आता पगाराच्या 12 टक्क्यांपेक्षाही प्रॉव्हिडंट फंडासाठी कमी पैसे देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांकडे असेल. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आधीच मंजुरी मिळाली आहे. आता संसदेतही हे विधेयक मंजूर झालं की EPFO या नियमाचं नोटिफिकेशन काढेल.

सध्या काय आहे स्थिती?

आता हा नियम थोडा सोपा करण्यात येणार आहे. सध्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांचंही पगाराच्या 12 - 12 टक्के योगदान असतं. संघटित क्षेत्रातले कर्मचारी आणि कंपनी हे दोघंही बेसिक पगाराच्या 12 टक्के भाग प्रॉव्हिडंट फंडात जमा करतात.

(हेही वाचा : रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा)

या क्षेत्रांसाठी नियम

MSME, टेक्सटाइल आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रांसाठी हा नवा नियम लागू होऊ शकतो. पण बाकीच्या क्षेत्रांवर याचा कसा परिणाम होईल ते हे विधेयक मंजूर झाल्यावरच कळू शकेल.हा नियम अमलात आणण्यासाठी मागच्या 5 वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण हे विधेयक सोशल सिक्युरिटी विधेयकासोबतच सादर होणार आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय आता सरकारच घेईल.

(हेही वाचा : खूशखबर! या 2 कारणांमुळे सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर)

नोकरी करणाऱ्यांना फायदा

प्रॉव्हिडंट फंडाचा भाग कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात पडणारा पगार वाढू शकेल.महागाईच्या दिवसांत हातात पडणारा पगार वाढणार असेल तर तो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आहे.

=================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneyPf
First Published: Dec 10, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या