मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock : 1.45 रुपयांवरून 82 रुपयांवर; सहा महिन्यांत 'या' शेअरची दणदणीत कामगिरी

Multibagger Stock : 1.45 रुपयांवरून 82 रुपयांवर; सहा महिन्यांत 'या' शेअरची दणदणीत कामगिरी

Proseed India नावाच्या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या एका कंपनीच्या शेअरच्या मूल्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5550 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले आहेत. त्यातच या शेअरचाही समावेश झाला आहे.

Proseed India नावाच्या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या एका कंपनीच्या शेअरच्या मूल्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5550 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले आहेत. त्यातच या शेअरचाही समावेश झाला आहे.

Proseed India नावाच्या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या एका कंपनीच्या शेअरच्या मूल्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5550 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले आहेत. त्यातच या शेअरचाही समावेश झाला आहे.

  मुंबई, 2 डिसेंबर : शेअर बाजार (Share Markert Investment) ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला त्याबद्दल आकर्षण असतं. शेअर बाजार कोसळला, तरी त्याची बातमी होते आणि शेअर बाजार उसळला, तरी त्याची बातमी होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे हमखास नुकसान असं मानणारा एक वर्ग असतो. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. शेअर बाजारात नुसती गुंतवणूक करणं ही जोखीम निश्चितच आहे; पण अभ्यासपूर्ण गुंतवणूक नक्कीच फायदा देते. ही बाब नुकतीच एका पेनी स्टॉकने (Penny Stock) सिद्ध केली आहे. अगदी किरकोळ किमतीच्या शेअरला पेनी स्टॉक असं म्हटलं जातं. एखाद्या शेअरची किंमत अगदी अल्पावधीत कित्येक पटींनी वाढते. अशा शेअर्सना मल्टिबॅगर (MultiBagger) असं संबोधलं जातं. Proseed India नावाच्या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या एका कंपनीच्या शेअरच्या मूल्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5550 टक्के वाढ झाली आहे. 2021 मध्ये अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले आहेत. त्यातच या शेअरचाही समावेश झाला आहे. मनीकंट्रोलने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

  प्रोसीड इंडिया या कंपनीच्या शेअरच्या मूल्यावर नजर टाकली, तर असं दिसतं, की गेल्या एका महिन्यात त्याची किंमत 103 रुपयांवरून घसरून 82 रुपयांवर आली आहे. म्हणजेच गेल्या महिन्याभरात या शेअरचं मूल्य 21 टक्क्यांनी घसरलं आहे; मात्र मागच्या सहा महिन्यांचा आढावा घेतला, तर असं लक्षात येतं, की या शेअरचं मूल्य 1.90 रुपयांवरून 82 रुपयांवर आलं आहे.

  Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख

  20 मे 2021 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात हा स्टॉक 1.45 रुपयांवर बंद झाला होता. दोन डिसेंबर 2021 रोजी या शेअरने 82 रुपयांच्या इंट्रा-डे उच्च पातळीला स्पर्श केला. म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांत हा शेअर तब्बल 5550 टक्क्यांनी वाढला.

  म्हणजे या शेअरच्या मूल्याचा अभ्यास केला, तर असं लक्षात येईल की महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये कुणी गुंतवले असते, तर आज त्याचे 79 हजार रुपये झाले असते; मात्र सहा महिन्यांपूर्वी यात कोणी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे तब्बल 43 लाख रुपये झाले असते. मे 2021 मध्ये या शेअरची किंमत 1.45 रुपये असताना कोणी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत थांबला असता, तर आज त्या व्यक्तीला 56.50 लाख रुपये मिळाले असते.

  Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर

  बाजार वरखाली होतो, त्या वेळी धरसोड वृत्तीपेक्षा टिकून राहण्याची वृत्ती उपयुक्त ठरते. त्याचं चांगलं उदाहरण या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना अनुभवता आलं असेल.

  First published:

  Tags: Investment, Money, Share market