आता मालमत्ता खरेदीत होणार नाही फसवणूक, मोदी सरकारने आणले नवे नियम

आता मालमत्ता खरेदीत होणार नाही फसवणूक, मोदी सरकारने आणले नवे नियम

आता तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल तर त्यामध्ये फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सरकारने नवे नियम आणले आहेत. एकच मालमत्ता अनेकांना विकण्याचा जो धोका असतो तो यामुळे टाळता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : आता तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल तर त्यामध्ये फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सरकारने नवे नियम आणले आहेत. एकच मालमत्ता अनेकांना विकण्याचा जो धोका असतो तो यामुळे टाळता येईल. CNBC - आवाज ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार सरकार मालमत्तेत होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक खास रणनीती तयार करतंय. यामध्ये मालमत्तेची नोंदणी ऑनलाइन होईल.

लँड रेकॉर्डसाठी पोर्टल

तुमची मालमत्ता जर 30 वर्षं जुनी असेल तर या मालमत्तेची डिजिटल नोंदणी होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या लँड रेकॉर्डसाठी एक पोर्टल बनवलं जाईल. या पोर्टलवर त्या मालमत्तेबद्दलची माहिती मिळू शकेल. या मालमत्तेचा मालक कोण, त्याने ती मालमत्ता कधी आणि कुणाला विकली या सगळ्याचा तपशील इथे मिळेल.

मालमत्तेच्या वादावर तोडगा

सूत्रांच्या माहितीनुसार, मालमत्तेचे वाद सोडवण्यासाठीही एक यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. Independent Grievance Redressal System या यंत्रणेच्या माध्यमातून मालमत्तेच्या वादावर तोडगा काढता येईल. 2008 मध्ये लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारांनी जमिनीची ऑनलाइन नोंदणी सुरू केली. पण आतापर्यंत 2 ते 3 टक्के नोंदणीच ऑनलाइन आहे.

(हेही वाचा : खाद्यपदार्थांत गडबड आढळली तर पैसे परत, मोदी सरकारची मोठी घोषणा)

आधार कार्डाला लिंक होऊ शकते मालमत्ता

मालमत्तेच्या मालकीसाठी सरकार एक नवा कायदा आणण्याची तयारी करतंय. यानुसार तुमच्या स्थावर मालमत्तेचा मालकी हक्क मिळवण्यासाठी त्याबदद्लचा तपशील आधार कार्डाला लिंक करावा लागेल. त्यामुळे मालमत्तेच्या खरेदी विक्रीतली फसवणूक टळेल. त्यासोबतच बेनामी संपत्तीचीही पोलखोल होईल.

यामुळे काय होईल फायदा ?

जो कोणी आधार कार्डला मालमत्तेचा तपशील लिंक करेल त्याच्या संपत्तीचा ताबा दुसऱ्या कुणी घेतला तर ती पुन्हा मिळवणं ही सरकारची जबाबदारी असेल. त्यासाठीची सरकार नुकसान भरपाईही देईल. मालमत्ता जर आधार कार्डला लिंक केली नाही तर मात्र सरकार कोणतीही जबाबदारी घेणार नाही. मालमत्तेचा तपशील आधार कार्डाला लिंक करणं हे ऐच्छिक आहे. लोकांना जर त्यांच्या संपत्तीची हमी हवी असेल तर आधार कार्डाला सगळा तपशील लिंक करावा लागेल.

==========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 17, 2019, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading