मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारात आज दोन दिवसांच्या तेजींनंतर प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स 90 तर निफ्टीत 19 अंकांची घसरण

शेअर बाजारात आज दोन दिवसांच्या तेजींनंतर प्रॉफिट बुकिंग; सेन्सेक्स 90 तर निफ्टीत 19 अंकांची घसरण

सेन्सेक्सच्या टॉप शेअरपैकी फक्त 12 शेअर हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत. याशिवाय 18 शेअरमध्ये विक्रीचा दबदबा राहिला आहे. आज सन फार्मा (Sunpharma share) 2.39 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज बाजारात प्रॉफिट बुकिंग (Profit Booking) झाली. आज बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 90.99 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 57,806.49 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक (Nifty) 19.65 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 17,213.60 वर बंद झाला.

12 स्टॉक तेजीत

सेन्सेक्सच्या टॉप शेअरपैकी फक्त 12 शेअर हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत. याशिवाय 18 शेअरमध्ये विक्रीचा दबदबा राहिला आहे. आज सन फार्मा (Sunpharma share) 2.39 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला आहे. याशिवाय IndisInd Bank, Dr Reddy, Bajaj Finance, Titan, Nestley India, HCL Tech, Maruti, Reliance आणि HUL यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.

Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त

SBI टॉप लूजर

आज घसरणाऱ्या शेअर्सच्या यादीत SBI अव्वल स्थानावर आहे. स्टेट बँकेचे शेअर्स 1.67 टक्क्यांनी घसरले आहेत. याशिवाय ITC, Tech Mahindra, NTPC, Axis BAnk, Tata Steel, Kotak Bank, M&M, Bharti Airtel, HDFC Bank, TCS, ICICI Bank, L&T, HDFC, Asian paints, Infosys आणि Powergrid यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

ZebPay सह तुम्ही तुमचा क्रिप्टोकरन्सी प्रवास का सुरू करावा याची 5 ठोस कारणे

सेक्टोरल इंडेक्स

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आज त्यात संमिश्र ट्रेड पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारानंतर Nifty Auto, Pharma, Realty, Healthcare आणि Consumer Durable Sectors मध्ये तेजी होती, त्यानंतर हे सेक्टर हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत. याशिवाय Nifty Bank, Financial Services, FMCG, IT, Media, Metal, PSU Banks आणि Private Banks यामध्ये आज विक्रीचे वर्चस्व आहे आणि ही सर्व क्षेत्रे लाल चिन्हाने बंद झाली आहेत.

First published:

Tags: Investment, Money, Share market