मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरपोच मिळणाऱ्या LPG सिलेंडरबाबत 'हा' नियम बदलणार, पुढील आठवड्यात लागू होणार नवी प्रक्रिया

सरकारी तेल कंपन्यांनी गॅस-सिलेंडर चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकांची योग्य ओळख होण्यासाठी हे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Karishma
1 नोव्हेंबरपासून LPG सिलेंडरच्या (LPG Cylinder delivery) होम डिलिव्हरीची प्रक्रिया बदलणार आहे. तेल कंपन्या LPG सिलेंडरचं नवं डिलिव्हरी सिस्टम (Delivery System) लागू करणार आहेत. सिलेंडरची होम डिलिव्हरी 1 नोव्हेंबरपासून OTP द्वारे केली जाणार आहे. या सिस्टममध्ये आता केवळ बुकिंग केल्यानंतर काम होणार नाही तर, ज्यावेळी सिलेंडरची डिलिव्हरी करणारा व्यक्ती घरी पोहचेल, त्यावेळी त्याला OTP सांगावा लागेल. त्यानंतरच सिलेंडर दिला जाईल.

सरकारी तेल कंपन्यांनी गॅस-सिलेंडर चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकांची योग्य ओळख होण्यासाठी हे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिस्टमला Delivery Authentication Code (DAC) असं नाव देण्यात आलं आहे. तेल कंपन्या Delivery Authentication Code सर्वप्रथम 100 स्मार्ट शहरांमध्ये सुरू करणार आहे. त्यानंतर इतर शहरांमध्ये लागू केलं जाईल. सध्या दोन शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू आहे.

सिलेंडर बुकिंगनंतर ग्राहकाच्या रिजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक कोड येतो. सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हा कोड दाखवल्यानंतरच सिलेंडर मिळणार आहे. जोपर्यंत ग्राहकाकडून हा कोड दिला जात नाही, तोपर्यंत सिलेंडरची डिलिव्हरी पूर्ण होणार नाही आणि स्टेटस पेंडिंगमध्ये राहील.

जर ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर डिलिव्हरी पर्सनकडे एक app असेल, त्या appद्वारे ग्राहक आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकेल आणि कोड जनरेट करेल. म्हणजे, डिलिव्हरीवेळीच ग्राहकांना आपला अपडेट नसलेला मोबाईल नंबर appद्वारे, डिलिव्हरीबॉयकडून अपडेट करून घेता येईल. त्यामुळे Real time बेसिसवर मोबाईल नंबर अपडेट होईल. मोबाईल नंबर अपडेट झाल्यावर लगेच कोडही जनरेट होण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ग्राहकाने चुकीचा नंबर, पत्ता किंवा इतर माहिती चुकीची दिल्यास, गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. हे सिस्टम कमर्शिल सिलेंडरसाठी नसून, केवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी लागू करण्यात येणार आहे.

First published:

पुढील बातम्या