ऑनलाइन बाइक इन्शुरन्स रिन्यू करायचंय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

ऑनलाइन बाइक इन्शुरन्स रिन्यू करायचंय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

Bike insurance - बाइकचा इन्शुरन्स दर वेळी रिन्यू करावा लागतो. त्याबद्दल घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : बाइकचा इन्शुरन्स खरेदी करणं सोपं असतं. पण इन्शुरन्स पाॅलिसी रिन्यू करणं कठीण काम आहे. तुम्ही बाइक इन्शुरन्स पाॅलिसी रिन्यू करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्याबद्दलच घ्या जाणून -

वेळेवर पाॅलिसी रिन्यू करा

पाॅलिसी संपायची शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. इन्शुरन्सशिवाय रस्त्यावर वाहन चालवणं गुन्हा आहे.  त्यामुळे रिन्युअल डेच्या बाबतीत अपडेट राहा. एक्सपायरी तारखेआधी रिन्युअल करा. इन्शुरन्स कंपनीचा काॅल किंवा मेसेज याकडे दुर्लक्ष करू नका.

रिन्युअल टाइम पेमेंटचा पुन्हा रिव्ह्यू करा

पाॅलिसी रिन्यू करताना तुम्ही पेमेंट आणि दर पुन्हा एकदा तपासून पाहा. कदाचित तुम्ही जास्त पैसे देत असाल. मग तुम्ही दुसरी कंपनी पाॅलिसी काय देतेय ते पाहून ती घेऊ शकता. तुमची आताची पाॅलिसी ऑनलाइन पेमेंट करणं सोपं आहे म्हणून तीच ठेवू नका.

योग्य IDV निवडा

Insured Declared Value टोटल सम अमाउंट असतं ते कवरमध्ये मिळतं. हे कवर तुम्हाला बाइक चोरीला गेली तर मिळू शकतं. IDV बाइकची बाजारातली किंमत आणि खरेदी केलेलं वर्ष असं मोजमाप करून केलं जातं. जास्त IDV असेल तर जास्त किंमत भरावी लागेल.

पण प्रीमियम कमी भरायला मिळतो म्हणून कमी IDV निवडू नका. IDV इतकी हवी, म्हणजे गरज पडली तरी भरपाई होऊ शकेल.

आवश्यक अॅड ऑन कव्हरेज घ्या

तुम्ही तुमच्या पाॅलिसीमध्ये अॅड ऑन कव्हर्स घेऊन माॅडिफाय करू शकता. यामुळे पाॅलिसीची व्हॅल्यू वाढते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bike
First Published: Aug 10, 2019 06:54 AM IST

ताज्या बातम्या