मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या बॅंकेपेक्षा FD वर दुप्पट व्याज देणार पोस्टाची 'ही' योजना, असा घ्या फायदा

तुमच्या बॅंकेपेक्षा FD वर दुप्पट व्याज देणार पोस्टाची 'ही' योजना, असा घ्या फायदा

FDवरील व्याजदर कमी होण्याची चिंता असल्यास पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करा.

FDवरील व्याजदर कमी होण्याची चिंता असल्यास पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करा.

FDवरील व्याजदर कमी होण्याची चिंता असल्यास पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करा.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : आर्थिक मंदीच्या काळात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात मोठी कपात केली आहे. अशा परिस्थितीत, पैसे कुठे गुंतवावे असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला बँकेकडून जास्त व्याज मिळेल आणि तुमचे पैसेही सुरक्षित असतील.

तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP) योजनेत चांगल्या परताव्यासाठी आपले पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज 6.9 टक्के मिळेल. या योजनेत पैशाची गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला पोस्ट ऑफिसकडून बॉण्डच्या स्वरूपात प्रमाणपत्र दिले जाते. जी तुम्हाला देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून मिळू शकेल.

वाचा-दावा: जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार 100 रुपये, हे आहे सत्य

KVP योजनेत गुंतवणूकीची मर्यादा नाही

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या KVP योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवू शकता. मात्र या योजनेत आपण किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक केली पाहिजे. आपण या योजनेतील गुंतवणूकीचे प्रमाणपत्र इतर कोणत्याही व्यक्तीस सहज हस्तांतरित करू शकता तसेच एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. त्याच वेळी तुम्ही देशातील काही बँकांकडून या योजनेचे बाँड खरेदी करू शकता.

वाचा-पुढील महिन्यापासून या बँकेत पैसे जमा करण्यासाठीही द्यावे लागणार शुल्क?

दोन लोकांच्या नावाने करू शकता गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या KVP योजनेत गुंतवणूकीचे तुम्ही दोन लोकांची नावेदेखील निवडू शकता. मात्र यात गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. जर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तर या योजनेसाठी एक प्रौढ आणि एक अल्पवयीन व्यक्तीचे नाव देऊ शकता.

वाचा-नोव्हेंबरमध्ये दिवाळीव्यतिरिक्त या दिवशीही असणार बँका बंद, सुट्टीची यादी तपासून

30 महिन्यांसाठी करू शकता गुंतवणूक

KVP योजनेत केलेली गुंतवणूक किमान अडीच वर्षे लॉक राहते. तुम्ही 30 महिन्यांपर्यंत या गुंतवणूकीची पूर्तता करू शकत नाही. त्याच वेळी, या योजनेतील आपली गुंतवणूक 6.9 टक्के वार्षिक व्याजदराने 10 वर्ष आणि 4 महिन्यांत दुप्पट होईल. मात्र, जर तुम्हाला आयकर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.

First published:

Tags: Post office, Sbi fd rates