नवी दिल्ली, 18 जानेवारी : आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (international Market) कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव उतरले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात तीन दिवसानंतर वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) गेल्या तीन दिवस दरात कोणतीही वाढ केली नव्हती, त्यामुळे गेले तीन दिवस पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर होते. पण आज सोमवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाली आहे.
सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84.95 रुपये इतका झाला. तर डिझेलचा दर प्रति लिटर 75.13 झाला आहे. आज दोन्ही इंधनांचे दर 25 पैशांनी वधारले आहेत.
1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या भावात प्रति लिटर 1.24 रुपये वाढ झाली असून, डिझेलचा दर 1.26 रुपयांनी वाढला आहे. नवीन वर्षात आतापर्यंत पाच वेळा पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.
काय आहेत तुमच्या शहरात दर -
दिल्लीत आज 18 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलचा दर वधारला आहे. पेट्रोलचा दर रविवारी 84.70 रुपये होता, तो आज 84.95 रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजेच लिटरमागे 25 पैसे वाढ झाली आहे. डिझेलचा दर रविवारी 74.88 रुपये होता, तो आज 75.13 रुपये प्रती लिटर झाला आहे. म्हणजेच डिझेलही लिटरमागे 25 पैशांनी महागले आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 24 पैशांनी वाढून 91.56 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव लिटरमागे 27 पैशांनी वाढून 81.87 रुपये प्रति लिटर झाला आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा भाव लिटरला 24 पैशांनी वाढून 86.39 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव 25 पैशांनी वाढून 78.72 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईत पेट्रोलचा दर 23 पैशांनी वधारून प्रती लिटर 87.36 रुपये झाला आहे, तर डिझेलच्या दरात 24 पैसे प्रती लिटर वाढ होऊन तो 80.43 रुपये प्रती लिटर झाला आहे.
बेंगळूरूमध्ये पेट्रोलचा दर 26 पैशांनी वधारून प्रति लिटर 87.82 रुपये आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 27 पैसे वाढ होऊन तो 79.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.
पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल डिझेलचे रोजचे दर एसएमएसच्या माध्यमातूनही जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑइल कंपनीचे ग्राहक आरएसपी (RSP) आणि आपल्या शहराचा पिनकोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक आरएसपी (RSP) हा मेसेज या नंबरवर 9223112222 आणि एचपीसीएलचे (HPCL) ग्राहक एचपी प्राईस (HP Price)असा संदेश 9222201122 या क्रमांकावर पाठवून एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.