घरातील उपकरणं अपग्रेड करण्यासाठी Flipkart चे बिग बिलियन डेज योग्य निमित्त, जाणून घ्या

घरातील उपकरणं अपग्रेड करण्यासाठी Flipkart चे बिग बिलियन डेज योग्य निमित्त, जाणून घ्या

टीव्हीच्या बाबतीतील काही टॉप डील्समध्ये realme’s 43” Full HD Smart TV केवळ 19,999 रुपयांत उपलब्ध होणार आहे. एखाद्या Full HD TV वरील हे सर्वोत्तम डील नसेल, तर आणखी कोणते असेल?

  • Share this:

जर आपण या कल्पनेपलीकडील वर्षामध्ये काही महत्त्वाची घरगुती उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही हे सहज आणि खात्रीने सांगतो की या खरेदीसाठी हीच वेळ योग्य आहे. Flipkart आपल्या वार्षिक बिग बिलीयन डेज सेलचे उद्घाटन करत आहे. नवीन घरगुती उपकरणे खरेदी करण्यासाठी यासारखी संधी असूच शकणार नाही. हा सेल 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीसाठी असणार आहे. Flipkart Plus मेम्बर्सना 15 रोजी, दुपारी 12 वाजता अर्ली अॅक्सेस मिळेल.

काय म्हटलंत? Flipkart च का? तर याच कारण असं की, या ई-कॉमर्समधील भव्य कंपनीमध्ये सर्वांत मोठा आणि व्यापक प्रोडक्ट कॅटलॉग तर आहेच शिवाय एक्सक्लुसिव्ह ब्रान्ड्स आणि कल्पक तंत्रज्ञान यामध्ये समाविष्ट आहे. हे सांगण्याची गरजच नाही की, काही स्टेलर डील ऑप्शन्स आणि त्यांच्या कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शन प्रोग्राम च्या मदतीने मनःशांती मिळवा. आपण एक-एक करून याचे तपशील पाहू.

टॉप टेक ब्रँन्ड्सची अत्याधुनिक उत्पादने-

FOMO टाळण्यासाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून, Flipkart ने realme, OnePlus, Nokia, Motorola सारखे बेस्ट ब्रँन्ड्स आणि LG, Sony, Samsung, Whirlpool, IFB , Bosch इ. घरगुती उपकरणांचे ब्रँन्ड्स एकत्र आणले आहेत जे टीव्ही आणि घरगुती उपकरणांच्या पहिल्या वहिल्या इनोव्हेशनसह कटिंग एज टेक्नोलॉजी असलेली काही नवीन उत्पादने लाँच होणार आहेत.

टीव्हीच्या बाबतीतील काही टॉप डील्समध्ये realme’s 43” Full HD Smart TV केवळ 19,999 रुपयांत उपलब्ध होणार आहे. एखाद्या Full HD TV वरील हे सर्वोत्तम डील नसेल, तर आणखी कोणते असेल? अन्य डील्समध्ये रू. 50,000हून कमी किंमतीत LG 55” 4K UHD Smart TV, रू. 40,000 पेक्षा कमी किंमतीत Sony’s 43” Smart UHD TV जे Flipkart साठी युनिक आहे. तसेच Thomson 32” HD Ready LED Smart TV या 32” टीव्हीची किंमत घसरून तो 11,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतो आहे.

अन्य घरगुती उपकरणांवरही आकर्षक डील्स देऊ केली जात आहेत, ज्यामध्ये IFB 6 kg 5 Star Front Load washing machine 19,000 रुपयांहून कमी किंमतीला मिळत आहे व त्यावर एक्स्चेंजवर जास्तीच्या 500 रुपयांची सूट मिळत आहे, Samsung 6.5 kg Top Load 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे जो पहिल्यांदाच मिळालेला भव्य डिस्काऊंट आहे.

रेफ्रिजरेटर्समध्ये आम्ही Flipkart वर आपल्या ऑफर प्राईसला उपलब्ध होऊन 24,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीला मिळणाऱ्या LG 260L 3 Star ची आम्ही शिफारस करतो, ज्यामध्ये एक्स्चेंजवर वाढीव 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. आणि Samsung 192L 4 star fridge रु. 16,000 पेक्षा कमी किंमतीत मिळतो आहे आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे खरेदी केल्यास रू. 750ची वाढीव सूट उपलब्ध आहे.

अन्य आवश्यक घरगुती उपकरणांमध्ये समाविष्ट होणारा LG 1 Ton Inverter AC ची कम्प्लीट एसी प्रोटेक्शनसह 50% डिस्काऊंटसह रू. 31,000 (MRP 54,990) पेक्षा कमी किंमतीला विक्री होत आहे. IFB 23L Convection Microwave एक्स्चेंजवरील वाढीव 1200 रुपयांच्या डिस्काऊंटसह 9,000 रुपयांहून कमी किंमतीला मिळतो आहे. घराच्या स्वच्छतेसाठी वाय-फाय(Wi-Fi) द्वारे स्मार्ट डिव्हायसेसशी कनेक्ट होणाऱ्या Eufy Robovac G10 Robotic Floor Cleaner ची माहिती मिळवा.

याखेरीज आपल्याला पंखे, गिझर्स, इमर्शन रॉड्स इ. बिग बिलियन डेजदरम्यान कमीत कमी 30% डिस्काउंट मिळतील, ज्यामुळे आपल्याला घरगुती उपकरणांतील गुंतवणुकीचा विचार करावा लागणार नाही.

नवीन इनोव्हेशन लाँच-

हे केवळ डिस्काउंट्सपुरते मर्यादित नाही. बिग बिलियन डेजदरम्यान realme’s 55” SLED 4K TV चे अनावरण होणार आहे, जो जगातील पहिला स्पेक्ट्रम LED TV असेल तसेच तो TUV Rheinland कडून आय केअर प्रोटेक्शनसाठी प्रमाणित झालेला पहिला-वहिला टीव्ही असणार आहे.

या उत्पादनाबाबत सांगायचं झालं तर हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांवर नक्कीच छाप पाडेल आणि या सेलच्या कालावधीदरम्यान हा केवळ रु. 39,999 (MRP 69,999) किंमतीला लाँच होईल. यातही रू. 11,000 पर्यंतच्या वाढीव एक्स्चेंज ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच, Supercoins वरही आकर्षक ऑफर्स आहेत.

स्वस्त पर्याय निवडून आपला भार कमी करा-

जर आपल्याला या सेलदरम्यान अधिकच्या खर्चाची चिंता वाटत असेल तर आम्ही याची पुन्हा ग्वाही देतो की, आपण सहजपणे आपल्या पसंतीची उपकरणे 24 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट-इएमआयच्या मदतीने घेऊ शकता. याखेरीज, बिग बिलियन डेजदरम्यान आपण कार्डलेस क्रेडीट, एक्स्टेंडेड वॉरंटी, कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शन आणि सर्व उत्पादनांच्या सुलभ एक्स्चेंजचाही लाभ घेऊ शकता.

आणि सर्वांत महत्त्वाचे, SBI Credit and debit cards वापरून आपण खरेदीवर 10% पर्यंत सूट मिळवू शकता किंवा Paytm द्वारे पेमेंट करून निश्चित कॅशबॅक मिळवू शकता. आता बजेटबाहेरच्या खरेदीला करा रामराम आणि खरेदी करा नवीन उपकरणे!

कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शनच्या मदतीने निश्चिंत व्हा-

Flipkart विक्रीनंतरच्या सेवांमध्येही आघाडीवर आहे. याची फीचर्स आपल्याला नक्की प्रभावित करतील. याचे कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शन सर्व घरगुती उपकरणांच्या श्रेणीला लागू आहे आणि त्यासोबत आहे या ई-कॉमर्स कंपनीकडून केलेल्या साध्याशा खरेदीपेक्षा खूप काही!

कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शन टीव्ही, रेफ्रिजरेटर,वॉशिंग मशीन आणि एसी यांसाठी एकूण ३ वर्षांसाठी पूर्ण वॉरंटी कव्हरेज( ब्रँड वॉरंटी आणि वाढीव वॉरंटी) देते. परिणामी ग्राहक त्यांच्या उपकरणांविषयीच्या कोणत्याही समस्यांसाठी ब्रँड वॉरंटीदरम्यान केवळ एका हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

यामध्ये अॅक्सिडेंटल डॅमेज/ लिक्विड डॅमेज / फिजिकल डॅमेज किंवा व्होल्टेज सर्ज इत्यादीपासून संरक्षण देखील देते जे वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही आणि घरपोच दुरुस्तीची सेवा आणि कोणत्याही दुरुस्तीसाठी ओरिजिनल स्पेअर पार्ट्सचे आश्वासनदेखील देते.

त्याखेरीज, पुढील तीन वर्षांत Flipkart वर आपले उपकरण अपग्रेड करायचे असल्यास, 2 वर्षात अपग्रेड केल्यास आपल्या सध्याच्या टीव्हीच्या किंमतीपैकी 40%, वॉशिंग मशीन व रेफ्रिजरेटरच्या सध्याच्या उपकरणाच्या 30% किंमतीसह कम्प्लीट अप्लायन्स प्रोटेक्शन संरक्षण निश्चित बायबॅक व्हॅल्यू देते. ऑफरवर 2 वर्षांच्या आत अपग्रेड केल्यास एसीसाठी, ए.सी. चांगल्या स्थितीत कार्यरत असल्याचे सुनिश्चित करून त्याच्या क्लिनिंग आणि नि:शुल्क सर्व्हिसिंगकरिता एक व्हिजीट आणि 1 विनामूल्य गॅस टॉप-अप देण्यात येते.

Flipkartवरील बिग बिलियन डेजदरम्यान कोठूनही आणि कधीही आपले घरगुती उपकरण अपग्रेड करण्यासाठी पर्याय शोधताना आपल्याला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे पुढे जा. आपल्याला याचा पश्चात्ताप होणार नाही!

ही भागीदारीची पोस्ट आहे.

First published: October 10, 2020, 6:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या