मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Ola S1 स्कूटरच्या टेस्ट राईडची प्रतीक्षा संपली; दिवाळीआधी प्री-बुकिंग सुरु

Ola S1 स्कूटरच्या टेस्ट राईडची प्रतीक्षा संपली; दिवाळीआधी प्री-बुकिंग सुरु

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.

  मुंबई, 20 ऑक्टोबर : इलेक्ट्रिक स्कूटर मॅन्युफॅक्चर कंपनी ओला ऑटोमोबिलने 15 सप्टेंबर 2021 रोजी भारतात Ola S 1 आणि Ola S 1 Pro ची विक्री सुरू केली. या स्कूटरची प्री-बुकिंग ऑगस्टमध्येच सुरू झाली होती. कंपनीने विक्रीच्या दोन दिवसांत 1,100 कोटी रुपयांहून अधिकचा ऑनलाईन व्यवसाय केला. या काळात अनेकांना ही ई-स्कूटर खरेदी करता आली नाही. दिवाळीत (Diwali Festival) ओला त्याच्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर (Ola E Scooter Booking) आणि टेस्ट राइडचे (Ola Test Ride) बुकिंग सुरू करणार आहे. त्यामुळे ओला एस -1 च्या टेस्ट राईडची तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दिवाळीपूर्वी बुकिंग मग टेस्ट राईड ओलाने जाहीर केले की दिवाळीनंतर ग्राहक 10 नोव्हेंबरपासून एस -1 आणि एस -1 प्रोची टेस्ट राईड घेऊ शकतात. तसेच ओला दिवाळीपूर्वी 1 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगचा दुसरा टप्पा सुरू करत आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना 10 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर स्कूटर खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला रंग आवडत नसेल तर तुम्ही बदलू शकता. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत किती आहे? ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 व्हेरिएंट पूर्ण चार्जवर 121 किमी अंतर धावू शकते. तर S1 प्रो पूर्ण चार्जवर 181 किमी पर्यंत जाऊ शकते. ओला एस 1 मॉडेल 3.6 सेकंदात 40 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकते. तर एस 1 प्रो फक्त 3 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. ओला स्कूटरची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ओला स्कूटरचे इतर फीचर्स
  • Ola S1 Pro ची बॅटरी क्षमता 3.97 kWh आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6.30 तास लागतात.
  • कंपनीचा दावा आहे की S-1 Pro ची बॅटरी 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
  • बॅटरी अर्धी चार्ज केली तरी स्कूटर 75 किमी पर्यंत जाऊ शकते.
  • एस 1 स्कूटर 2,999 रुपयांच्या मासिक हप्त्यात उपलब्ध होईल.
  • एस 1 प्रो साठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल.
  • एचडीएफसी बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅप्सवर प्री-अप्रुव्ह कर्ज देईल.
  • कर्ज आवश्यक नसेल, तर S1 साठी 20,000 रुपये अॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल.
  • ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 25,000 रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Auto expo, Money, Tech news

  पुढील बातम्या