प्रसार भारतीत 60 जागांवर नोकरीची संधी, 'या' पदांसाठी होतेय भरती

प्रसार भारतीत 60 जागांवर नोकरीची संधी, 'या' पदांसाठी होतेय भरती

Prasar Bharati Recruitment 2019 - तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर प्रसार भारतीत मोठी संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : प्रसार भारती ही भारतातली मोठी सरकारी ब्राॅडकास्टिंग एजन्सी आहे. दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ यांच्याशी संलग्न असलेल्या या संस्थेत भरती आहे. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ग्रेड या पदांवर व्हेकन्सी आहेत. एकूण 60 जागा आहेत.

पदं आणि पदसंख्या

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह - 42

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ग्रेड I - 18

आता Amazonवर फक्त 1000 रुपयात करा 'ही' बाइक बुक

शैक्षणिक पात्रता

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी MBA (मार्केटिंग) किंवा मार्केटिंगमध्ये PG डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव हवा. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ग्रेड I या पदासाठी MBA (मार्केटिंग) किंवा मार्केटिंगमध्ये PG डिप्लोमा, 4 वर्षाचा अनुभव हवा.

वयाची अट - 6 ऑगस्ट 2019ला 35 वर्षापर्यंत हवं .

नोकरीचं ठिकाण पूर्ण भारतभर आहे. अर्ज पोचण्याची शेवटची तारीख आहे 6 ऑगस्ट 2019.

भारतीय रेल्वेच्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये मिळतील विमानासारख्या 'या' 6 सुविधा

अर्ज पाठवण्यासाठी http://prasarbharati.gov.in/ आणि https://drive.google.com/file/d/1dY-lyvgwVPvJ5FDqO_HKUMxZnmXWG0Ch/view  इथे क्लिक करून पाहा.

दरम्यान, मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

यात रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.

इंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर चांगलं पडेल इंप्रेशन

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

VIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा

First published: July 13, 2019, 8:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading