मुलीच्या लग्नात खर्च केले 485 कोटी, आता कंगाल झाला प्रसिद्ध भारतीय उद्योगपती

मुलीच्या लग्नात खर्च केले 485 कोटी, आता कंगाल झाला प्रसिद्ध भारतीय उद्योगपती

प्रमोद मित्तल यांच्याकडे सध्या 1.10 लाख पाउंडची संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे उत्पन्न शून्य आहे. मित्तल आपल्या कर्जदारांचा अगदी छोटासा भाग देण्यास तयार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : स्टील किंग लक्ष्मी मित्तल (Laxmi Mittal) यांचे धाकटे बंधू प्रमोद मित्तल (Pramod Mittal) यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सुमारे 485 कोटी रुपये खर्च केले. आता प्रमोद मित्तल यांना ब्रिटनमधील सर्वात मोठे दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. प्रमोद मित्तल यांनी जवळजवळ 254 कोटी पाउंड कर्ज घेतले होते.

लंडनच्या इन्सॉल्वेंसी अँड कंपनी कोर्टाने 64 वर्षांच्या प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केले आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्यावर एकूण 254 कोटी पाउंडचे (सुमारे 25 हजार कोटी रुपये) कर्ज आहे. यात 17 कोटी पाउंडचे कर्जही आहे, जे त्यांनी 94 वर्षी वडिलांकडून घेतले होते. तसेच पत्नी संगीताकडून 11 लाख पाउंड , मुलगा दिवेशकडून 24 लाख पाउंड आणि नातेवाईक अमित लोहियाकडून 11 लाख पाउंड उसने घेतले आहेत.

प्रमोद मित्तल यांच्याकडे सध्या 1.10 लाख पाउंडची संपत्ती शिल्लक आहे आणि त्यांचे उत्पन्न शून्य आहे. मित्तल आपल्या कर्जदारांचा अगदी छोटासा भाग देण्यास तयार आहेत आणि त्यांना दिवाळखोरीच्या या समस्येवर तोडगा मिळेल अशी आशा आहे. डायरेक्ट इनव्हेस्टमेंट लिमिटेड या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड कंपनीकडून त्यांनी सर्वात जास्त कर्ज घेतले आहे आणि त्यांना अजूनही सुमारे 100 कोटी पाउंड परत करायचे आहेत.

वाचा-'आयातीवर अधिकचा कर नको' रघुराम राजन यांचा 'आत्मनिर्भर भारत'वरून इशारा

मुलीच्या लग्नावर केले होते 485 कोटी खर्च

प्रमोद मित्तल यांनी 2013मध्ये आपल्या मुली सृष्टीचे गुलराज बहल या गुंतवणूक बँकरबरोबर लग्न केले होते. यात त्यांनी आपला भाऊ लक्ष्मी मित्तल याची मुलगी वनिषाच्या लग्नापेक्षाही जास्त 5 कोटी (सुमारे 485 कोटी) खर्च केले होते.

वाचा-अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येत आहे, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

असे झाले दिवाळखोर

मित्तल उत्तर बोस्नियामधील मेटलर्जिकल कोक प्रॉडक्ट्स कंपनी ग्लोबल इस्पात कोकसना इंडस्ट्रिजा लुकावाक (GIKIL) या कंपनीचे सह-मालक होते आणि त्यांचे सुपरव्हायजरी बोर्डचे मंडळाचे प्रमुख आहेत. मात्र या कंपनीच्या कर्जासाठी त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती आणि येथून त्यांच्या दिवाळखोरीला सुरुवात झाली. 2013 मध्ये ही कंपनी सुमारे 16.6 कोटी डॉलर्सचे कर्ज अदा करण्यात अपयशी ठरली. या प्रकरणी प्रमोद मित्तल यांना गेल्या वर्षी कंपनीच्या अन्य दोन अधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली होती. भारतातही सार्वजनिक कंपनी स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनकडे (STC) 2200 कोटी रुपयांच्या फसवणूकीत पैशाच्या घोटाळ्याचे प्रकरण सुरू आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2020, 9:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या