मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खरं की काय, जनधन खातेधारकाला सरकार देतंय 10 हजार रुपये?

खरं की काय, जनधन खातेधारकाला सरकार देतंय 10 हजार रुपये?

जनधन खातेधारकांसाठी गुडन्यूड

जनधन खातेधारकांसाठी गुडन्यूड

जनधन खातेधारकांना सरकार 10 हजार रुपये देत आहे, मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या शाखेत अर्ज करावा लागेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : प्रत्येकाचं बँकेत खातं असायला हवं आणि सरकारी योजनांचा गोरगरीबांना गरजूंना लाभ घेता यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेत जनधन खात्याची सुविधा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे.

देशभरात सुमारे 47 कोटी लोकांनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाती उघडली आहेत, मात्र या खात्यावर उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती कोट्यवधी लोकांना नाही. जनधन खातेधारकांना सरकार 10 हजार रुपये देत आहे, मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या शाखेत अर्ज करावा लागेल.

याशिवाय या खात्याचे अनेक फायदे आहेत, जसे की 1 लाख 30 हजार रुपयांचा विमा या खात्यांवर उपलब्ध आहे. तुम्हालाही या योजनांची माहिती नसेल तर तात्काळ जाणून घ्या आणि 10 हजार रुपयांसाठी अर्ज करा.

जनधन खात्यावर खातेदाराला अनेक प्रकारचे लाभ दिले जातात. पहिला फायदा म्हणजे या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा त्रास खातेदाराला होत नाही. याशिवाय रुपे डेबिट कार्ड दिले असून तुम्हाला हवे असल्यास बँकेत अर्ज करून या खात्यावर १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट घेता येतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

जनधन खातेधारकांना सरकार अनेक सुविधा पुरवते, त्यात खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. याशिवाय ३० हजार रुपयांचे आयुर्विमा संरक्षणही दिले जाते. एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला तर त्या खातेदारांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये विमा संरक्षण रक्कम दिली जाते.

जर तुम्हालाही या योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही अद्याप कोणतंही जनधन खातं उघडलं नसेल तर तुम्ही हे खातं उघडू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Modi government, Pm modi