Home /News /money /

आज करा इथे करा गुंतवणूक, सेवानिवृत्तीच्या वेळी व्हाल करोडपती; वाचा काय आहे योजना

आज करा इथे करा गुंतवणूक, सेवानिवृत्तीच्या वेळी व्हाल करोडपती; वाचा काय आहे योजना

पीपीएफ (Public Provident Fund) ही सरकारद्वारे (government Small Investment Scheme) चालवली जाणारी एक छोटी बचत योजना (Small Saving Scheme) आहे.

मुंबई, 23 जानेवारी: पीपीएफ (Public Provident Fund) ही सरकारद्वारे (government Small Investment Scheme) चालवली जाणारी एक छोटी बचत योजना (Small Saving Scheme) आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (long term investment) हा एक चांगला पर्याय आहे. सेवानिवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. यातून मिळणारं व्याजाचं उत्पन्न टॅक्स फ्री असतं. त्यावर मिळणारं व्याज आयकर कलम 80 सी अंतर्गत टॅक्स फ्री आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा सेवानिवृत्तीसाठी टॅक्स फ्री फंड तयार करण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. तुम्हाला एनपीएस किंवा म्युच्युअल फंडासारख्या जास्त रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीवर टॅक्स भरावा लागतो; पण पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम टॅक्स फ्री असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योजना आकर्षक ठरत आहे. एका आर्थिक वर्षात यामध्ये कमीतकमी 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तुम्ही नियमितपणे पीपीएफ अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर 1 कोटी रुपये मिळू शकतात. हे वाचा-मोबाइलमधील UMANG अ‍ॅप वापरुन काढता येईल PF Advance, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमधून निवृत्तीनंतर 1 कोटी रुपयांचा निधी मिळवायचा असेल, तर गुंतवणूकदाराला 25 वर्षं दर वर्षी दीड लाख रुपये जमा करावे लागतील. असं झालं, तर त्याला सध्याच्या व्याजदरानुसार 1 कोटी रुपये मिळतील. यावर चक्रवाढ व्याज दीर्घ कालावधीसाठी मिळतं. त्यामुळे ही रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत वाढते. एखाद्याने 20 वर्षं दर वर्षी 1.5 लाख रुपये जमा केले, तर त्याला सध्याच्या व्याजदरानुसार 66.60 लाख रुपये मिळतील. गुंतवणुकीची मुदत पुढील 5 वर्षांसाठी वाढवली तर पीपीएफ शिल्लक 1 कोटी रुपये होईल. 25 ते 30 वर्षांचे असताना अकाउंट उघडल्यास फायदा तुम्ही 25 ते 30 वर्षं वयोगटात असतानाच पीपीएफ अकाउंट उघडल्यास आणि 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये ते तीनदा वाढवल्यास, तुम्ही निवृत्तीपूर्वी 30 वर्षं सहज गुंतवणूक करू शकता. 30 वर्षांसाठी दर वर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.54 कोटी रुपये मिळतील. पीपीएफमध्ये गुंतवणूक एकरकमी किंवा 12 समान हप्त्यांमध्ये करता येते. ही योजना 15 वर्षांसाठी असते; पण त्याची मुदत आणखी वाढवता येऊ शकते. यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो. हे वाचा-'या' लार्जकॅप शेअरमध्ये पैसे गुंतवून मिळू शकतो चांगला परतावा; तज्ज्ञ काय सांगतात टॅक्समध्ये मिळेल सूट पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गुंतवणुकीला ट्रिपल ई टॅक्स सवलतीचा लाभ मिळाला आहे. येथे ट्रिपल ई म्हणजे म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैशावर कोणताही टॅक्स नाही. त्यावर मिळणारं व्याजदेखील टॅक्स फ्री असतं. 15 वर्षांनी मॅच्युरिटी म्हणून मिळणारी रक्कमदेखील टॅक्स फ्री असेल. या अकाउंटमध्ये तुम्ही जमा करत असलेली 1.5 लाख रुपयांची रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. पीपीएफ खात्यावर मिळणारं व्याज इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त आहे. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनेत इतर योजनांप्रमाणे गॅरंटी रिटर्न मिळतात.
First published:

Tags: Open ppf account, PPF

पुढील बातम्या