Home /News /money /

नोकरीदरम्यान करा गुंतवणूक, निवृत्तीपर्यंत बना कोट्यधीश! काय आहे योजना?

नोकरीदरम्यान करा गुंतवणूक, निवृत्तीपर्यंत बना कोट्यधीश! काय आहे योजना?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा करमुक्त सेवानिवृत्ती निधी तयार करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. तुम्हाला NPS किंवा म्युच्युअल फंडासारख्या (Mutual Fund) उच्च परताव्याच्या गुंतवणुकीवर कर भरावा लागतो, ज्यामुळे PPF गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक बनते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जानेवारी : पीपीएफ (Public Provident Fund) ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक छोटी बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long Term Investment) हा एक चांगला पर्याय आहे. निवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. तसेच, त्यावर मिळणारे व्याज आयकर कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा करमुक्त सेवानिवृत्ती निधी तयार करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. तुम्हाला NPS किंवा म्युच्युअल फंडासारख्या (Mutual Fund) उच्च परताव्याच्या गुंतवणुकीवर कर भरावा लागतो, ज्यामुळे PPF गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक बनते. कोट्यवधींचा निधी गोळा करू शकतो एका आर्थिक वर्षात यामध्ये किमान 500 रुपये किंवा कमाल 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि तुम्ही नियमितपणे पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर 1 कोटी रुपये मिळू शकतात. Cryptocurrency गुंतवणूकदारांचे 18 ट्रिलियन डॉलरचं नुकसान, Bitcoin ला देखील फटका पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्यातून निवृत्तीनंतर 1 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी, गुंतवणूकदाराला 25 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या PPF खात्यात 25 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर त्याला सध्याच्या व्याजदरानुसार 1 कोटी रुपये मिळतील. यावर चक्रवाढ व्याज दीर्घ कालावधीसाठी मिळते. त्यामुळे ही रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत वाढते. जर एखाद्याने 20 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले, तर त्याला वर्तमान व्याजदरानुसार 66.60 लाख रुपये मिळतील. गुंतवणुकीची मुदत पुढील 5 वर्षांसाठी वाढवली तर PPF शिल्लक 1 कोटी रुपये होईल. 1.54 कोटींची रक्कम तुम्ही 25 ते 30 वर्षाचे असताना पीपीएफ खाते उघडल्यास आणि 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये ते तीनदा वाढवल्यास, तुम्ही निवृत्तीपूर्वी 30 वर्षे सहज गुंतवणूक करू शकता. 30 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणुकीची रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.54 कोटी रुपये गोळा करण्यात मदत करू शकते. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे पीपीएफ खाते वाढवण्यासाठी नियम PPF मध्ये गुंतवणूक एकरकमी किंवा 12 समान हप्त्यांमध्ये करता येते. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. पण ती आणखी वाढवता येईल. यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो. पाच वर्षांच्या कालावधीत, तुम्ही त्याची अंतिम मुदत वाढवू शकता. कर सूट पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील या गुंतवणुकीला ट्रिपल ई कर सवलतीचा (Tax relaxation) लाभ मिळाला आहे. येथे ट्रिपल ई म्हणजे - तुम्ही गुंतवलेल्या पैशावर कोणताही कर नाही. त्यावर मिळणारे व्याज देखील करमुक्त आहे आणि 15 वर्षांनी मॅच्युरिटी म्हणून मिळणारी रक्कम देखील करपात्र नाही. या खात्यात तुमची 1.5 लाख रुपये जमा रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त आहे. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, PPF

    पुढील बातम्या