• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PPF आणि NPS कुठल्या योजनेत सर्वाधिक फायदा? वाचा सविस्तर

PPF आणि NPS कुठल्या योजनेत सर्वाधिक फायदा? वाचा सविस्तर

एनपीएसमध्ये मुदतपूर्तीसाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. तर पीपीएफची मुदत 15 वर्षांनी संपते. मॅच्युअर होते. त्यानंतर पुढे पाच वर्षे सुरू ठेवता येते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ज्यांना निवृत्तीवेतनाची तरतूद नसते अशा लोकांना जास्तीची आर्थिक तरतूद करण्याची गरज असते. याकरता बहुतांश लोक पीपीएफ (Public Provident Fund PPF), पोस्टाच्या अल्प बचत (Small Savings Scheme) योजना आदींना प्राधान्य देतात. या योजना सुरक्षित आणि अधिक परतावा देणाऱ्या असतात. नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही योजना दीर्घकालीन असून, प्रत्येक योजनेचे काही फायदे आणि तोटे आहेत. एनपीएस योजनेत 60 वर्षं वयानंतर पेन्शन (Pension) मिळते, तर पीपीएफमध्येही पेन्शनसाठी गुंतवणूक केली जाते; परंतु यात मुदत संपेपर्यंत पैसे ठेवावे लागतात. जाणून घेऊया या योजनांचे फायदे आणि तोटे. पीपीएफ आणि एनपीएसपैकी कोणत्या योजनेत अधिक फायदा? पीपीएफ हा 100 टक्के डेट फंड (Debt Fund) आहे ज्यात सुरक्षित पर्यायांमध्ये पैसे गुंतवले जातात. यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. तर एनपीएसचे पैसे कर्जरोखे (Debt) आणि इक्विटीमध्ये (Equity) गुंतवले जातात. यामध्ये गुंतवणूकदाराला 75 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये गुंतवण्याचा पर्याय असतो. तसंच तो कर्ज रोखे आणि इक्विटीमध्ये निम्मी निम्मी गुंतवणूक करू शकतो. दीर्घ कालावधीत या गुंतवणुकीवर 10 ते 12 टक्के परतावा मिळतो. एनपीएसमध्ये मुदत संपल्यानंतर, किमान 40 टक्के रक्कम अन्युईटीमध्ये (Annuity) जमा करावे लागतात. त्यातूनच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. LIC Policy: मॅच्युरिटीआधी करायची आहे पॉलिसी सरेंडर, वाचा काय आहे नियम पीपीएफ आणि एनपीएस या दोन्हीमधील गुंतवणूक करमुक्त (Tax Benefit) आहे. एनपीएसमध्ये दीड लाख रुपयांच्या गुंतवणूकीसह 50 हजार रुपयांची अतिरिक्त कर सवलतही मिळते. पीपीएफमध्ये फक्त दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते आणि त्यावर कर सवलत मिळते. एनपीएसमध्ये मुदतपूर्तीसाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. तर पीपीएफची मुदत 15 वर्षांनी संपते. मॅच्युअर होते. त्यानंतर पुढे पाच वर्षे सुरू ठेवता येते. तज्ञांच्या मते, पीपीएफ चालू ठेवण्याचा पर्याय घेतला पाहिजे. यामुळे चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. PPF मध्ये दरमहा 3 हजार रुपये गुंतवल्यास इतकी रक्कम मिळेल पीपीएफमध्ये दरमहा 3 हजार रुपये गुंतवल्यास मुदत संपल्यानंतर 37.08 लाख रुपयांचा निधी तयार केला जाईल. तुम्ही 30 व्या वर्षी दरमहा 3 हजार रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये असेल. यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तर मुदत संपल्यानंतर 37.08 लाख रुपये मिळतील. Post Office ची खास स्कीम, पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा; वाचा काय आहे योजना NPS मध्ये दरमहा 3 हजार रुपये गुंतवल्यास इतकी रक्कम मिळेल एनपीएसमध्ये दरमहा 3 हजार रुपये गुंतवले तर एका वर्षात 36 हजार रुपये गुंतवले जातील. वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही एकूण 10.80 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला त्यावर 8 टक्के दराने व्याज मिळेल आणि मुदत संपल्यानंतर तुम्हाला 44.52 लाख रुपये मिळतील.
  First published: