Home /News /money /

PPF खाते बंद झाले तर अजिबात चिंता करू नका, अशाप्रकारे पुन्हा करा सुरू

PPF खाते बंद झाले तर अजिबात चिंता करू नका, अशाप्रकारे पुन्हा करा सुरू

PPF खात्यामध्ये तुम्ही वार्षिक कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार पर्यंतची गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीचा कर बचत हा महत्त्वाचा फायदा आहे.

    नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: सध्याच्या महागाईच्या काळात आणि जोखीम अधिक असणाऱ्या परिस्थितीत पीपीएफ गुंतवणूक एक सुरक्षित आणि सुविधाजनक आहे. मात्र जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली आहे आणि काही कारणास्तव तुमचे खाते बंद झाले आहे तर घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण तुम्ही केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा खाते अत्यंत सोप्या पद्धतीने सुरू करू शकता. जाणून घ्या पुन्हा कसे चालू कराल तुमचे PPF खाते कशी केली जाते PPF खात्यामध्ये गुंतवणूक? तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) मध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. खाते उघडल्यांनतर वार्षिक कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1 लाख 50 हजाराची तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. एक व्यक्ती केवळ एकच पीपीएफ खाते उघडू शकते. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही कर बचतीचा देखील लाभ घेऊ शकता. याशिवाय मॅच्यूरिटी वेळी मिळणारी रक्कम आणि व्याजाचे उत्पन्न देखील करमुक्त असते. (हे वाचा-Gold Prices Today: 2 दिवसात 1600 रुपयांनी वाढले सोन्याचे भाव, चांदीलाही झळाळी) का बंद होऊ शकते पीपीएफ खाते? पीपीएफ खातेधारकाने जर एखाद्या आर्थिक वर्षाममध्ये  न्युनतम रक्कम खात्यामध्ये नाही भरली तर ते खाते स्थगित केले जाते. पीपीएफमध्ये मॅच्युरिटीनंतर 15 वर्षांनी तुम्हाला व्याजासहित सर्व रक्कम मिळते. दर वर्षीच्या शिल्लक रकमेत व्याज जोडले जाते. बंद पडलेल्या पीपीएफ खात्याच्या बाबतीत देखील हा नियम लागू होतो. त्याचप्रमाणे सरकार वेळोवेळी व्याजदर निश्चित करते. मॅच्यूरिटी आधी बंद पडलेले पीपीएफ खाते स्थायी स्वरुपात बंद करता येत नाही. मात्र बंद पडलेले हे खाते मॅच्युरिटीआधी कधीही चालू करता येते. तुम्हाला मिळालेल्या पासबुकवर पीपीएफची मॅच्यूरिटी तारीख असते. (हे वाचा-PM Kisan Scheme: पुढील महिन्यातच मिळणार 2000 रुपये, अशाप्रकारे नोंदवा तुमचं नाव) पुन्हा कसे सुरू कराल PPF खाते? तुम्ही ज्या बँकेत किंवा पीपीएफ खाते उघडले आहे त्याठिकाणी हे बंद पडलेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी 500 रुपयासह तुम्हाला 50 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल. प्रतिवर्षानुसार हे शुल्क निश्चित केले जाईल. बंद खात्यातील शिल्लक रक्कम मॅच्यूरिटीआधी तुम्हाला रिव्हाइव्ह करता येणार नाही. पीपीएफ मध्ये 15 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. हा एक सुरक्षित पर्याय आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हे खाते बंद होऊ दिले नाही तर ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. बंद झाल्यास ते लगेच सुरू देखील करा.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Open ppf account, PPF

    पुढील बातम्या