दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होणार वीज, ग्राहकांना होणार फायदा

दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होणार वीज, ग्राहकांना होणार फायदा

आता एका दिवसात विजेच्या वापराचे वेगवेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. यानुसार वीज दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : वीजबिलाच्या बाबतीत आपण सगळेच जण दक्ष असतो. ग्राहकांची यात कुठेही फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण संघटनाही खबरदारी घेत असतात. आता सरकार ग्राहकांच्या हितासाठी वीजबिलाबद्दल एक निर्णय घेणार आहे.

आता एका दिवसात विजेच्या वापराचे वेगवेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. CNBC-आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊर्जा मंत्रालयाच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयाची अमलबजावणी 2 महिन्यांत करण्याचा सरकारचा विचार आहे. यानुसार वीज दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होऊ शकते.

(हेही वाचा : PF च्या नियमांत होणार मोठा बदल, तुम्हाला होणार फायदा)

लवकरच होणार निर्णय

एकाच दिवसात विजेचे नेमके दर ठरवले जातील. मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबाने सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विजेचे दर काय असावेत हे ठरवलं जाणार आहे. वीजपुरवठा आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्राशी संबधित संरचनेचा आढावा घेण्यात आला आणि यावर निर्णय झाला. आता 2 महिन्यांच्या आत राज्यांची सहमती घेऊन हा निर्णय अमलात आणला जाईल.

(हेही वाचा : Aadhaar Card वरचा मोबाइल नंबर बदलणं आता झालं सोपं, असं करा हे काम)

राज्यांना इन्सेटिव्ह

आता विजेचे जे दर आहेत त्यामध्ये आणखी वाढ होणार नाही याची दक्षता घेतली जातेय. सौरऊर्जेची उपलब्धता जास्त असल्याने दिवसा ग्राहकांना याचा फायदा होईल. जे राज्य या निर्णयाची अमलबजावणी करतील त्या राज्यांना काही इन्सेटिव्ह दिले जातील. जी राज्यं हे करणार नाहीत त्यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत कपात केली जाईल. त्यामुळे केंद्राचा हा निर्णय अमलात आणण्यासाठी राज्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 07:19 PM IST

ताज्या बातम्या