Home /News /money /

सावधान! देशातील सर्वात मोठ्या Egg Market वर बर्ड फ्लूचा धोका

सावधान! देशातील सर्वात मोठ्या Egg Market वर बर्ड फ्लूचा धोका

कोरोनानंतर अंडी बाजारात काहीसा नफा सुरू झाला असताना आता, या नव्या धोक्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता मोठी वाढली आहे.

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : देशातील दोन सर्वात मोठ्या अंडी मार्केटमध्ये बर्ड फ्लूचा (Bird Flu) धोका निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये दररोज मृत्यू होणाऱ्या कोंबड्यांमुळे पोल्ट्री (Poultry) फार्म व्यावसायिकांची भीती वाढली आहे. तसंच, यावर कोणताही इलाज नसल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोरोनानंतर अंडी बाजारात काहीसा नफा सुरू झाला असताना आता, या नव्या धोक्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता मोठी वाढली आहे. पोल्ट्री फार्म व्यावसायिक अनिल शाक्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या बरवाला बाजारात दररोज 1.25 कोटी ते 1.5 कोटी अंड्यांचा व्यापार होतो. तर अजमेर बाजारात दररोज 70 ते 80 लाख अंड्यांचा सप्लाय होतो. आता राजस्थानमध्ये बर्ड फ्लूची चर्चा असताना, हरियाणामध्येही बर्ड फ्लूचा धोका वाढतो आहे.

  (वाचा - कोरोना वॅक्सिनसाठी CoWIN अ‍ॅपवर रजिस्टर करावं लागेल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस)

  अनिल शाक्या यांनी न्यूज18 शी बोलताना सांगितलं की, पोल्ट्री फार्म मोठे असतात. ठिकठिकाणी शेड लावलेल्या असतात. जर बर्ड फ्लूची संक्रमित हवा फार्ममध्ये केवळ दोन शेडजवळ आल्यास, त्या शेडजवळील कोंबड्या आजारी पडून, त्यांचा मृत्यू होईल. एखाद्या पोल्ट्री फार्ममध्ये 10 कोंबड्यांचा जरी बर्ड फ्लूने मृत्यू झाला, तरी खबरदारी म्हणून सर्व कोंबड्या नष्ट कराव्या लागतात.

  (वाचा - LIC ची खास पॉलिसी; एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभरासाठी पेन्शनची गॅरेंटी घ्या)

  दरम्यान, थंडीच्या दिवसांत पुन्हा एकदा अंड्याचे भाव वाढले आहेत. अंड्याचा भाव (egg price today) गेल्या 3 ते 4 वर्षातील रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 20 डिसेंबर रोजी अंड्याच्या ओपन मार्केट रेटने मागील तीन वर्षातील ऑफिशियल रेटचा रेकॉर्ड तोडला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या