फक्त 100 रुपयांत Post Office मध्ये उघडा खातं, FD पेक्षा होईल जास्त फायदा

फक्त 100 रुपयांत Post Office मध्ये उघडा खातं, FD पेक्षा होईल जास्त फायदा

Post Office, NSC - गुंतवणूक सुरक्षित हवी आणि करही वाचला पाहिजे, मग जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या स्कीमबद्दल

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : तुम्हाला गुंतवणूकही करायचीय आणि करही वाचवायचाय. तर मग पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवू शकत. हा चांगला पर्याय आहे. यात जास्त व्याज मिळतंच पण करातही चांगली सवलत मिळते. सरकारनं 5 वर्षाच्या NSC वर व्याज दर 7.9 टक्के केलाय. बँकेत एफडी करूनही इतकं व्याज मिळत नाही. म्हणूनच एनएससीमध्ये पैसे गुंतवणं फायदेशीर होतं.

जाणून घ्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटबद्दल

1.100 रुपयांत उघडू शकता खातं - ज्या पद्धतीने 100, 500, 2000च्या नोटा असतात त्याच पद्धतीने एनएससी सर्टिफिकेट 100, 500, 1000, 2000अशा प्रकारात असतात. यात तुम्ही कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता.

3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

2. कुठे उघडणार खातं? - ही पोस्टाची स्कीम आहे. त्यामुळे देशभरातल्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं उघडू शकता.

3. कोण करू शकतं गुंतवणूक?- कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. एवढंच नाही तर मुलांच्या नावावरही गुंतवणूक करता येऊ शकते. या सर्टिफिकेटची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते.

खूशखबर, आज पेट्रोल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

4. NSCचा फायदा - NSC चा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. एनएससीवर पूर्वी 8 टक्के दर वर्षाला व्याज मिळत होतं. आता ते 7.9 टक्के झालंय.  NSC स्माॅल सेविंग्समध्ये येतं आणि सरकार दर तीन महिन्यांनी स्माॅल सेव्हिंगसाठी व्याजदरात बदल करत असतं.  तुम्ही 1 लाख रुपयांची NSC खरेदी कराल तर तुमचे पैसे 9 वर्षात दुप्पट होतील.

...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही

5. कधी काढू शकतो पैसे ? - याचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा असला तरीही 1 वर्षांनी तुम्ही पैसे काढू शकता

6. सुरक्षित गुंतवणूक - या योजनेचं विशेष म्हणजे ही योजना पूर्णपणे सरकारी आहे. यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि सरकारने जेवढं सांगितलं तेवढं रिटर्न तुम्हाला नक्कीच मिळेल. याशिवाय यासाठी तुम्हाला फार धावपळ करायचीही गरज नाही.

7. टॅक्ससोबत हे फायदेही मिळतील- सर्वात फायदेशीर म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा पर्याय उपलब्ध आहे. आयकर अधिनियम ८०सी नुसार तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. शिवाय तुमचा टीडीएसही कापला जात नाही. अशावेळी तुम्ही वेळेच्याआधी रक्कम काढू शकता. पण यावर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल.

VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

Published by: Sonali Deshpande
First published: July 26, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading