पोस्ट ऑफिस सुरू करतेय 'ही' नवी सुविधा, घरबसल्या मिळतील फायदे

पोस्ट ऑफिस सुरू करतेय 'ही' नवी सुविधा, घरबसल्या मिळतील फायदे

Post Office - जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या या नव्या सुविधेबद्दल -

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : भारतात सध्या ऑनलाइन मार्केट झपाट्यानं वाढतंय. आता त्यात भारतीय पोस्ट ऑफिसही उडी घेतंय. लवकरच पोस्ट ऑफिस ई ट्रेडिंग सुरू करतंय. सरकारच्या ई काॅमस प्लॅटफाॅर्मवर ग्राहकांची संख्या फ्लिपकार्टच्या ग्राहकांपेक्षा जास्त आहे. अमेझाॅन आणि फ्लिपकार्टप्रमाणे पोस्ट ऑफिसही आपल्या ई काॅमर्स पोर्टलवर कपड्यांपासून एसी, फ्रिजसारख्या मोठ्या आणि छोट्या वस्तू विकणार आहे. ग्राहक त्या ऑनलाइन खरेदी करू शकतात. अनेक कंपन्या, विक्रेते या पोर्टलशी जोडले जातायत.

केंद्र सरकारनं 2016मध्ये ई मार्केटप्लेस नावानं  ई काॅमर्स प्लॅटफाॅर्म लाँच केला होता. पोस्ट ऑफिसचे अधिकारी राजकुमार म्हणाले, या पोर्टलबरोबर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालीय. या पोर्टलवरून खरेदी केलेल्या वस्तू देशात कुठल्याही भागात पोचवल्या जातील. सध्या अंबाला इथे पायलेट प्रोजेक्ट सुरू केला जातोय. नंतर तो इतर ठिकाणीही सुरू केला जाईल.

खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

अनेकदा ऑनलाइन शाॅपिंगला फसवलंही जातं. म्हणून पोस्ट ऑफिस ग्राहकांपर्यंत वस्तू पोचवण्याची जबाबदारी स्वत: घेणार आहे. कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस आपलं कमिशन कापून सामानाची किंमत फर्मला जमा करेल.

'या' बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळतो FD पेक्षा जास्त फायदा

ग्राहकांच्या सामानाला स्पीड पोस्टानं पोस्टमॅन घरापर्यंत पोचवेल. फ्री होम डिलिवरी, तसंच रिटर्नचाही ऑप्शन असेल. कुठलीही कंपनी आपलं रजिस्ट्रेशन मोफत पोस्ट ऑफिसच्या पोर्टलवर करू शकते.  त्याआधी कंपनीला पोस्ट ऑफिससोबत करार करावा लागेल. त्यानंतर कंपनीला कोड दिला जाईल. या कोडनंतर कंपनी आपलं उत्पादन डिसप्ले करू शकते.

'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

फ्री होम डिलिवरी आणि रिटर्नचा पर्याय

स्पीड पोस्टानं वस्तू ग्राहकांच्या घरी पोचवल्या जातील. त्याला चार्ज पडणार नाही. या प्लॅटफाॅर्मचा फायदा मोठ्या आणि छोट्या कंपन्यांना होईल. ग्राहकांना माल आवडला नाही तर ते रिटर्न करू शकतात.

पोस्ट ऑफिस घेईल 10 टक्के कमिशन

या ई काॅमर्स प्लॅटफाॅर्ममुळे पोस्ट ऑफिस आपली आर्थिक स्थिती मजबूत करेल. सरकारी एजन्सीच्या वस्तूंवर 7 टक्के आणि खासगी एजन्सीकडून 10 टक्के कमिशन पोस्ट ऑफिस घेईल.

भन्नाट सायकलिंगचा थरार, अंगावर शहारे आणणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या