मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुंतवणूक करून मिळवा दुप्पट रिटर्न; Post office Savings Schemes मार्फत कमाईची मोठी संधी

गुंतवणूक करून मिळवा दुप्पट रिटर्न; Post office Savings Schemes मार्फत कमाईची मोठी संधी

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

पोस्ट खात्याच्या फक्त 3 योजना (Post Office Savings Schemes) तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

  नवी दिल्ली, 19 मे : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातलेलं असल्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. बचत खात्यासह (Savings Schemes)  सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर व्याजदर घटले आहेत. छोट्या गुंतवणूकदारांसाठी असलेल्या पोस्ट खात्याच्या योजनाही (Post Office Savings Schemes) त्याला अपवाद नाहीत. मात्र अन्य योजनांच्या तुलनेत या योजनांचे व्याजदर चांगले आहेत. त्यातच 2020-21 या आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत या योजनांचे असलेले व्याजदर सरकारने 2021-22 या नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीसाठीही कायम ठेवले आहेत.

  दर तीन महिन्यांनी या योजनांच्या व्याजदराचा आढावा घेतला जातो आणि आवश्यकता असल्यास ते कमी किंवा जास्त केले जातात. येत्या एक जुलैपासून या आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही सुरू होईल. तेव्हा दर कदाचित घटवले जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तत्पूर्वी या योजनांत गुंतवणूककेल्यास आधीच्या व्याजदराचा लाभ मिळू शकेल. काही योजनांची माहिती घेऊ या.

  किसान विकास पत्र (KVP)

  किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास ठरावीक कालावधीत पैसे दुप्पट होऊ शकतात. किसान विकास पत्रही योजना देशातल्या सगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये आणि सगळ्या महत्त्वाच्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महिने आहेत. त्यात कमीत कमी 1000 रुपये गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

  हे वाचा - Gold Price Today: सोने दरात काहीशी घसरण, चांदीही 1400 रुपयांहून उतरली

  या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. यात केलेली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होते. म्हणजेच एका वेळी एक लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीच्या वेळी दोन लाख रुपये मिळतील.

  पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD)

  फिक्स्ड डिपॉझिट अर्थात मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल. हे खातं एक वर्षे, दोन वर्षे, तीन वर्षे किंवा पाच वर्षांसाठी उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये एक ते तीन वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 5.5 टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. पाच वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 6.7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल. गुंतवणूक केलेली रक्कम मॅच्युरिटीपूर्वी काढायची असेल, तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज खात्याएवढाच व्याजदर मिळेल. पाच वर्षांपर्यंतच्या टाइम डिपॉझिटवर सेक्शन 80 सी अंतर्गत करात सवलत मिळते.

  नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC)

  नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अर्थात NSC ही पोस्ट ऑफिसची एक चांगली योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. तसंच, 80 सी अंतर्गत करसवलतही मिळते. दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. या योजनेत वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज मिळतं. हे चक्रवाढ व्याज असतं.

  हे वाचा - तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का? जाणून घ्या यामुळे होणारे 5 मोठे तोटे

  याव्यतिरिक्त फिक्स्ड डिपॉझिट करायचं असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वाधिक 5.40 टक्के व्याजदर देत आहे.

  First published:

  Tags: Investment, Money, Post office saving, Savings and investments