• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • India Post ची ही स्कीम करेल पैसे दुप्पट! वाचा काय आहे योजना

India Post ची ही स्कीम करेल पैसे दुप्पट! वाचा काय आहे योजना

एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना त्यात आपले पैसे किती सुरक्षित आहेत याचा सर्वसाधारणपणे विचार केला जातो. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग योजना (Post Office Small Saving Scheme) देखील कमी बचतीमध्ये चांगला रिटर्न देणाऱ्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना त्यात आपले पैसे किती सुरक्षित आहेत याचा सर्वसाधारणपणे विचार केला जातो. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग योजना (Post Office Small Saving Scheme) देखील कमी बचतीमध्ये चांगला रिटर्न देणाऱ्या आहेत. इंडिया पोस्टने एकूण 9 छोट्या बचत योजना सुरू केल्या आहेत. या छोट्या बचत योजनांपैकीच एक महत्त्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate). यामध्ये तुम्हाला चांगल्या रिटर्नसह सरकारी सुरक्षा देखील मिळेल. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अंतर्गत, तुम्ही तुमचे खाते किमान 1000 रुपयांमध्ये किंवा त्यांनतर पुढे 100 रुपयांच्या पटीत उघडू शकता. या अंतर्गत, रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या अंतर्गत जमा केलेला कर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वजावटीसाठी पात्र आहे. हे वाचा-घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का; बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारी काय आहे मॅच्युरिटी पीरिएड? या योजनेअंतर्गत, मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते मुदतपूर्तीपूर्वीच बंद केले जाते. काय आहे NSC चा व्याजदर? इंडिया पोस्टच्या या योजनेअंतर्गत, ठेवींवर वार्षिक 6.8 टक्के दराने चक्रवाढ व्याज दिले जाते. जर कोणी या योजनेत 1000 रुपये जमा केले तर त्याला 5 वर्षानंतर 1389.49 रुपये मिळतील. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चे फायदे भारत सरकारच्या पाठिंब्यामुळे ही गुंतवणूक जवळजवळ जोखीममुक्त आहे. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांच्या गुंतवणुकीसह जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सहज उपलब्ध आहे कारण ते कोणत्याही भारतीय पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकते. अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरही NSC खरेदी करता येते. 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळतो. हे वाचा-सामान्यांना परवडणारं आहे का आजचं पेट्रोल? जाणून घ्या 1 लीटर इंधनाचे दर कुणाला उघडता येईल खातं? या योजनेअंतर्गत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती आपले खाते उघडू शकते. यामध्ये तीन व्यक्ती त्यांचे संयुक्त खाते देखील उघडू शकतात. याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत पालकाद्वारे अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडता येते. NSC कर लाभ NSC ही प्रामुख्याने कर बचत होणारी गुंतवणूक आहे कारण आयकर कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपात उपलब्ध आहे. मात्र 5 व्या वर्षी कमावलेल्या व्याजावर गुंतवणूकदाराच्या विद्यमान कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: