पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे

Post Office, Modi Government - तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर या योजनेबद्दल जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : मोदी सरकारनं नुकतेच छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पोस्ट ऑफिसच्या जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या मधे गॅरेंटेड रिटर्न स्कीम्समध्ये कमी व्याज मिळेल. पण पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे त्यात तुमचा फायदा आहे. ती योजना आहे किसान विकास पत्र. याचा व्याजदर आता 7.6 टक्के आहे. छोट्या बचत योजनेत किसान विकास पत्र एकदम हिट आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही स्कीम घेऊ शकता. त्याची सुरुवात 1000 रुपयांपासून होणार.

किती महिन्यांनी तुमचे पैसे होतील दुप्पट?

अर्थमंत्रालयानं सांगितल्याप्रमाणे, किसान विकास पत्रात जमलेली रक्कम आता 9 वर्ष 5 महिने  म्हणजे 113 महिन्यांत दुप्पट होईल. किसान विकास पत्राचा व्याज दर कमी झालाय. तो आता 7.6 टक्के केलाय. एप्रिल-जूनमध्ये तो 7.7 टक्के होता. सरकार नेहमीच छोट्या बचतींच्या व्याजदरात बदल करत असते.

LIC मध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

काय आहे किसान विकास पत्र?

हे एक बाँडप्रमाणे प्रमाणपत्र आहे. ते तुम्ही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. सरकारकडून त्यावर व्याज मिळतं.

काॅलेज विद्यार्थ्यांना एका मिनिटात 'इथे' मिळेल कर्जापासून नोट्सपर्यंत सर्व काही

 किती पैसे गुंतवावे लागतात?

यात पैसे गुंतवण्याची काही मर्यादा नाही. पण कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतात. कोणीही व्यक्ती KVP मध्ये 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकते. KVP 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांच्या मूल्यात मिळतं.

कुठे मिळेल किसान विकास पत्र ? (KVP)

कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र मिळू शकतं. तुम्ही छोट्या मुलांच्या नावेही घेऊ शकता. त्यासाठी 2 पासपोर्ट साइज फोटोज, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी ), घराचं प्रमाणपत्र ( वीज बिल, टेलिफोन बिल, बँक पासबुक इत्यादी ), तुमची गुंतवणूक 50 हजारापेक्षा जास्त असेल तर पॅन कार्डाची गरज आहे.

कधी काढू शकाल पैसे?

तुम्हाला पैसे काढायचे असतील तर 113 महिन्याची वाट पहावी लागेल. आर्थिक तज्ज्ञ सांगतात, किसान विकास पत्रात खूप काळासाठी गुंतवणूक करावी.

पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

असा मिळतो फायदा

KVP सर्टिफिकेट घेतल्यानंतर अडीच वर्षांनी पैसे काढता येतात. समजा तुम्ही 1000 रुपयांचं किसान विकास पत्र घेतलं असेल तर तुम्हाला 1,173 रुपये मिळतील. हेच जर 3 वर्षांनी काढले तर 1,211 रुपये मिळतील. साडेतीन वर्षानंतर 1,251 रुपये हातात येतील. आणि 9 वर्ष 5 महिन्यांनी KVPमध्ये गुंतवले तर दुप्पट होतील. तुम्ही किसान विकास पत्र दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता.

पुरात अडकलेल्या सांगलीकरांसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या