Home /News /money /

Post Office Scheme मध्ये बँक FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवा, वाचा डिटेल्स

Post Office Scheme मध्ये बँक FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवा, वाचा डिटेल्स

पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्या कामी येऊ शकतात. येथील गुंतवणूकही सुरक्षित आहे आणि परतावाही जास्त आहे. आम्ही येथे पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजनांबद्दल चर्चा करत आहोत जिथे तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा (Return more than Bank FD) मिळत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जानेवारी : बँक एफडीच्या (Bank FD) घटत्या व्याजदरामुळे लोक गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधत आहेत. आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्या कामी येऊ शकतात. येथील गुंतवणूकही सुरक्षित आहे आणि परतावाही जास्त आहे. आम्ही येथे पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजनांबद्दल चर्चा करत आहोत जिथे तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा (Return more than Bank FD) मिळत आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) >> तुम्हाला NSC मधील गुंतवणुकीवर 8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. >> व्याज फक्त वार्षिक आधारावर मोजले जाते. परंतु ही रक्कम तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळते. >> तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. >> अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने NSC खाते उघडता येते आणि 3 प्रौढांच्या नावाने संयुक्त खाते उघडता येते. >> त्याची खास गोष्ट म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील पालकांच्या देखरेखीखाली हे खाते उघडू शकतात. >> या योजनेअंतर्गत, तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर वाचवू शकता. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) >> KVP या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आहे. >> गुंतवणूक करण्यासाठी वय 18 वर्षे असावे. अल्पवयीन मुले गुंतवणूक करू शकतात परंतु पालकांच्या देखरेखीखाली असेल. >> सध्या या योजनेत 9 टक्के व्याज दिले जात आहे. >> एकल खाते आणि संयुक्त खात्याची सुविधा आहे. >> अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 5 वर्षे वाट पाहावी लागेल. >> कलम 80C अंतर्गत प्राप्तिकरातही सवलत मिळते. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी मंथली इनकम स्कीम (Monthly Income Scheme) >> या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना मासिक एक निश्चित रक्कम कमावण्याची संधी मिळते. >> या योजनेत, तुम्हाला एकरकमी रक्कम एकाच किंवा संयुक्त खात्यात जमा करावी लागेल. त्यानंतर या रकमेनुसार दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे येतात. >> येथे तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 5 लाख रुपये जमा करू शकता, तर जर संयुक्त खाते असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. >> या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. >> या योजनेअंतर्गत 6.6 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Post office

    पुढील बातम्या