पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतात बँकेपेक्षा जास्त पैसे, अशी करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतात बँकेपेक्षा जास्त पैसे, अशी करा गुंतवणूक

Post Office - गुंतवणूक अशी हवी ज्यानं तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि वाढतीलही. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम नेहमीच बचतीसाठी चांगला पर्याय ठरलीय. जाणून घेऊ अशा स्कीमबद्दल ज्यात सर्वसामान्य खात्यापेक्षा चांगले रिटर्न मिळतात. शिवाय कर सवलतही मिळते. शिवाय यात धोकाही नाही. सरकारी असल्यानं ती पूर्ण सुरक्षित आहे.

काय आहे योजना?

पोस्ट ऑफिसची ही योजना आहे बचत योजना. सरकारनं ही स्कीम सुरू केलीय. नॅशनल सेव्हिंग स्कीमचे खूप फायदे आहेत. ज्या पद्धतीने 100, 500, 2000च्या नोटा असतात त्याच पद्धतीने एनएससी सर्टिफिकेट 100, 500, 1000, 2000अशा प्रकारात असतात. यात तुम्ही कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता.

खूशखबर, आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

किती मिळतं व्याज?

सरकारनं 5 वर्षाच्या NSC वर व्याज दर 7.9 टक्के केलाय. बँकेत एफडी करूनही इतकं व्याज मिळत नाही. म्हणूनच एनएससीमध्ये पैसे गुंतवणं फायदेशीर होतं.

कोणीही गुंतवणूक करू शकतं

कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. एवढंच नाही तर मुलांच्या नावावरही गुंतवणूक करता येऊ शकते. या सर्टिफिकेटची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते.

आता परदेशात PHD करण्याची संधी, मोदी सरकार करणार खर्च

पैसे कधी काढता येतात?

या स्कीमची मॅच्युरिटी 5 वर्षांची असली तरीही 1 वर्षांनी पैसे काढता येतात. दर तीन महिन्यांनी NSC चे व्याजदर बदलू शकतात.

18 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीही ही योजना घेऊ शकतात

18 वर्षांहून लहान असलेले कुणीही याचा फायदा घेऊ शकतात. फक्त ही स्कीम त्यांच्या पालकांनी त्यांच्या नावे घ्यावी लागते. तसंच NRI आणि HUF (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली) या स्कीमचा फायदा घेऊ शकत नाहीत.

इंजिनीअरिंगचं स्वप्न बघणाऱ्या मुलींसाठी आता सरकारी स्कॉलरशिप; असा करा अर्ज

करात सवलत

सर्वात फायदेशीर म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा पर्याय उपलब्ध आहे. आयकर अधिनियम ८०सी नुसार तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. शिवाय तुमचा टीडीएसही कापला जात नाही. अशावेळी तुम्ही वेळेच्याआधी रक्कम काढू शकता. पण यावर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल.

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 12:13 PM IST

ताज्या बातम्या