• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक

कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. एवढंच नाही तर मुलांच्या नावावरही गुंतवणूक करता येऊ शकते.

 • Share this:
  मुंबई, 10 जून : लोकांना कमी काळात पैसे दुप्पट होतील, अशा गुंतवणुकीचे पर्याय हवे असतात. शिवाय त्यांना यात धोकाही जास्त नको असतो. जास्त करून लोक बँकेत फिक्स्ड डिपाॅझिट ( FD ) ठेवणं पसंत करतात. पण अशी एक योजना  आहे जी कमी काळात एफडीपेक्षा जास्त तुम्हाला पैसे मिळवून देते. ही योजना आहे पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट्स ( NSC ). जाणून घेऊ याबद्दल - देशातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिस बँचमधून NSC सर्टिफिकेट्स तुम्ही घेऊ शकता. NSC चा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. एनएससीवर 8 टक्के दर वर्षाला व्याज मिळतं. NSC स्माॅल सेविंग्समध्ये येतं आणि सरकार दर तीन महिन्यांनी स्माॅल सेव्हिंगसाठी व्याजदरात बदल करत असतं. 8 टक्के व्याज दरानं तुम्ही 1 लाख रुपयांची NSC खरेदी कराल तर तुमचे पैसे 9 वर्षात दुप्पट होतील. समजा तुम्ही SBI मध्ये FD केलंत, तर तुमचे पैसे 10.5 वर्षात दुप्पट होतील. वर्षभर या उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड काळाच्या पडद्याआड ज्या पद्धतीने 100, 500, 2000च्या नोटा असतात त्याच पद्धतीने एनएससी सर्टिफिकेट 100, 500, 1000, 2000अशा प्रकारात असतात. यात तुम्ही कितीही रुपयांची गुंतवणूक करू शकता. सध्या सेव्हिंग बँकेचं व्याज हे ४ टक्क्यांनी सुरू होतं. तर एनएससी ८ टक्क्यांनी वार्षिक वाढ देत आहे. हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण कोण करू शकतं गुंतवणूक- कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. एवढंच नाही तर मुलांच्या नावावरही गुंतवणूक करता येऊ शकते. या सर्टिफिकेटची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते. या योजनेचं विशेष म्हणजे ही योजना पूर्णपणे सरकारी आहे. यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि सरकारने जेवढं सांगितलं तेवढं रिटर्न तुम्हाला नक्कीच मिळेल. याशिवाय यासाठी तुम्हाला फार धावपळ करायचीही गरज नाही. टॅक्ससोबत हे फायदेही मिळतील- सर्वात फायदेशीर म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा पर्याय उपलब्ध आहे. आयकर अधिनियम ८०सी नुसार तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. शिवाय तुमचा टीडीएसही कापला जात नाही. अशावेळी तुम्ही वेळेच्याआधी रक्कम काढू शकता. पण यावर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान
  First published: