मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दरमहा 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनंतर मिळतील 16 लाख, बँक FD पेक्षा बेस्ट आहे पोस्टाची योजना

दरमहा 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीनंतर मिळतील 16 लाख, बँक FD पेक्षा बेस्ट आहे पोस्टाची योजना

Post Office Recurring Deposit : पोस्टाच्या विविध योजनांमध्ये बँक, म्युच्यूअल फंड इत्यादीमध्ये केलेल्या गुंतवणुकींपेक्षा जोखीम कमी असते.

Post Office Recurring Deposit : पोस्टाच्या विविध योजनांमध्ये बँक, म्युच्यूअल फंड इत्यादीमध्ये केलेल्या गुंतवणुकींपेक्षा जोखीम कमी असते.

Post Office Recurring Deposit : पोस्टाच्या विविध योजनांमध्ये बँक, म्युच्यूअल फंड इत्यादीमध्ये केलेल्या गुंतवणुकींपेक्षा जोखीम कमी असते.

    नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते कारण सरकारी गॅरंटीच्या स्कीम्स तुम्हाला मिळत असतात. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनेत गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरेल. यामध्ये रिटर्न देखील चांगला मिळतो.पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये (Small Saving Scheme) कमी गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवता येतो. अशाच योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. काय आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना? या योजनेमध्ये अत्यंत कमी पैशात तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. यामध्ये तुम्ही 100 रुपये महिना एवढीही गुंतवणूक करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही आहे. तुम्हाला जमतील तेवढे पैसे या योजनेत गुंतवता येतील. पोस्ट ऑफिसचे आरडी डिपॉझिट अकाउंट उत्तम व्याजदर तर देतेच पण छोटे हप्ते असल्यामुळे ग्राहकांसाठी ही योजना सोयीची आहे. तसंच यामध्ये सरकारी गॅरंटी देखील आहे. किती मिळेल व्याज? पोस्ट ऑफिसमध्ये जे आरडी खाते उघडले जाते कमीत कमी 5 वर्षांसाठी असते. प्रत्येक तिमाहीला (वार्षिक दराने) जमा रकमेवर व्याज मोजले जाते. हे व्याज तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये चक्रवाढ व्याजासह (Compound Interest) जोडले जाते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार आरडी योजनेवर सध्या 5.8 टकके व्याज दिले जात आहे. 1 जुलै 2020 पासून हा नवा दर लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला त्यांच्या छोट्या बचत योजनांसाठी व्याज दराची घोषणा करते. (हे वाचा-LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000, एकदाच भरावा लागणार प्रीमियम) सध्याच्या व्याजदरानुसार, जर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले  तर मॅच्यूरिटीवेळी तुम्हाला 16.28 लाख रुपये मिळतील. RD खात्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे जर तुम्ही वेळेत एखादा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. आरडी योजनेत हप्ता भरण्यात उशिर झाल्यास प्रत्येक महिन्याला एक टक्के दंड द्यावा लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही सलग 4 हप्ते भरले नाहीत तर तुमचे खाते  बंद होईल. मात्र हे खाते  बंद झाल्यास 2 महिन्याच्या आतमध्ये ते पुन्हा सक्रीय करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Post office

    पुढील बातम्या