पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दर महिन्याला घ्या फायदा

Post Office, MIS - पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच स्कीम आहेत. जाणून घ्या एका फायदेशीर योजनेबद्दल

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : तुमच्याकडे एकरकमी पैसे आहेत आणि ते तुम्हाला गुंतवायचे आहेत. तुम्हाला दर महिन्याला रिटर्न मिळण्यासाठी पोस्ट ऑफिसटी मन्थली इन्कम स्कीम ( MIS ) तुम्हाला उपयोगी आहे. यात दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1500 रुपयात पोस्ट ऑफिसमध्ये खातं सुरू करावं लागेल. तुम्ही दर 5 वर्षांनी पुढच्या 5 वर्षांकरता ही स्कीम वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला कायमच मिळकत सुरू राहू शकते.

काय आहे योजना?

पोस्ट ऑफिसच्या या मन्थली इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांच्या मते ही योजना सर्वोत्तम आहे. याचे 4 मोठे फायदे आहेत. हे खातं कुणीही उघडू शकतं. तुमची मुद्दल कायम राहते. बँक एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत यातून मिळणारं रिटर्न जास्त आहे. तुम्हाला दर महिन्याला निश्चित मिळकत होते. तुमची स्कीम पूर्ण झाली की गुंतवलेले पैसेही परत मिळतात. ती रक्कम तुम्ही परत गुंतवू शकता.

4 दिवसांनी पेट्रोल झालं महाग, 'या' आहेत आजच्या किमती

कोण उघडू शकतं खातं?

तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे खातं उघडू शकता. मुल 10 वर्षांपेक्षा लहान असेल तर आईवडील मुलाच्या नावे खातं उघडू शकतात. मुलाचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तो किंवा ती स्वत: ते खातं चालवू शकतात.

चहलने सरकारी नोकरीसाठी फिल्डिंग करताना घातला होता चष्मा!

किती करायची गुंतवणूक?

मन्थली इन्कम स्कीम कुणीही उघडू शकतं. तुमचं खातं सिंगल असेल तर तुम्ही 4.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवू शकता, तर जाॅइंट असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता. यात कमीत कमी 1500 रुपये ठेवले तरी चालतं.

व्याजावर करसवलत नाही

या योजनेत जमा केलेल्या रकमेवर आणि व्याजावर करसवलत मिळत नाही. तुम्हाला मिळणाऱ्या कमाईवर TDS लागत नाही. पण वर्षाच्या मिळकतीवर इन्कम टॅक्स लागू शकतो.

सुपरस्टारला किस करायला नकार देणं आणि होकार देणंही 2 अभिनेत्रींना असं पडलं महाग

दर महिन्याला होईल मिळकत

या स्कीममध्ये दर वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळतं. ते 12 महिन्याला वाटलं जातं तुम्ही 9 लाख रुपये जमा केलेत तर तुमचं वर्षाचं व्याज 68,400 रुपये असेल. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 5,700 रुपये मिळकत होईल. मॅच्युरिटीनंतर तुमचे 9 लाख रुपये बोनससहित परत मिळतील.

कसं उघडायचं खातं?

तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, व्होटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एकाची झेराॅक्स जमा करावी लागेल. शिवाय 2 पासपोर्ट साइज फोटो लागतील.

MIS चा फायदा

याचे 4 मोठे फायदे आहेत. हे खातं कुणीही उघडू शकतं. तुमची मुद्दल कायम राहते. बँक एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत यातून मिळणारं रिटर्न जास्त आहे. तुम्हाला दर महिन्याला निश्चित मिळकत होते. तुमची स्कीम पूर्ण झाली की गुंतवलेले पैसेही परत मिळतात. ती रक्कम तुम्ही परत गुंतवू शकता.

VIDEO: 5 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 5 मजली इमारत

Published by: Sonali Deshpande
First published: July 23, 2019, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading