Home /News /money /

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत तुमचे पैसे होतील दुप्पट; टॅक्स बचतीसह आणखी काय लाभ मिळेल?

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत तुमचे पैसे होतील दुप्पट; टॅक्स बचतीसह आणखी काय लाभ मिळेल?

किसान विकास पत्र योजनेमध्ये 6.9 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. त्यानुसार, या योजनेत जमा केलेले तुमचे पैसे केवळ 124 महिन्यांत दुप्पट होतील. याचा अर्थ तुमची मूळ रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.

    मुंबई, 26 जून : पोस्ट ऑफिसमध्ये (Indian Post Office) गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारत सरकारच्या पाठिंब्यामुळे त्याच्या सर्व योजना हमखास परतावा देतात. यामुळे, गुंतवणूकदारांना (Investors) त्यांच्या गुंतवणुकीची चिंता करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना (Post Office Investment Options) आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो. यामुळे त्यांच्यातील गुंतवणूक अधिक आकर्षक बनते. पोस्ट ऑफिसच्या विविध गुंतवणुकीच्या योजनांपैकी किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही एक योजना लोकप्रिय आहे. तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेत दीर्घकाळ पैसे गुंतवायचे असतील, तर किसान विकास पत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेत तुमची गुंतवणूक रक्कम काही वर्षांत दुप्पट होते. याचा अर्थ असा की जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये जमा केले तर ते काही वर्षांत 10 लाख रुपये होतील. आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाई किसान विकास पत्र योजनेमध्ये 6.9 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. त्यानुसार, या योजनेत जमा केलेले तुमचे पैसे केवळ 124 महिन्यांत दुप्पट होतील. याचा अर्थ तुमची मूळ रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते. तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. मॅच्युरिटी कालावधी किती? किसान विकास पत्राचा मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षे आणि 4 महिने आहे. याचा अर्थ जेव्हा तुमची मूळ रक्कम दुप्पट होते तेव्हा योजना मॅच्युअर होते. तुम्ही किसान विकास पत्र 1000, 5000, 10000 आणि 50000 च्या स्वरूपात खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकता. मुदतपूर्तीनंतर, तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता. घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्न खाते कोण उघडू शकते? या योजनेंतर्गत कोण खाते उघडू शकते हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. प्रौढ व्यक्तीसोबत जॉईंट अकाऊंट, अल्पवयीन किंवा 10 वर्षांवरील अल्पवयीन व्‍यक्‍तीच्‍या नावाने पालक संयुक्‍त खाते उघडू शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Post office

    पुढील बातम्या