मराठी बातम्या /बातम्या /मनी /Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना; तुमचे पैसे सुरक्षितपणे करा दुप्पट

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना; तुमचे पैसे सुरक्षितपणे करा दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या Post Office Time Deposit Scheme या योजनेत व्याज सुविधेचा लाभ वेळेवर मिळतो. जर तुम्ही ही योजना 1 ते 3 वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या Post Office Time Deposit Scheme या योजनेत व्याज सुविधेचा लाभ वेळेवर मिळतो. जर तुम्ही ही योजना 1 ते 3 वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या Post Office Time Deposit Scheme या योजनेत व्याज सुविधेचा लाभ वेळेवर मिळतो. जर तुम्ही ही योजना 1 ते 3 वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.

मुंबई, 9 नोव्हेंबर : गुतंवणूक करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. मात्र कमी धोका चांगले रिटर्न जिथे मिळतात तिथे गुंतवणूकदारांचा कल जास्त असतो. यासाठी मग लोक बँका आणि पोस्ट ऑफिसला प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या वतीने ग्राहकांना अनेक योजनांचा (Post Office Schemes) लाभ दिला जातो, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता. याशिवाय तुम्हाला या सर्व योजनांवर व्याजाचा लाभही मिळतो. या सर्व फायद्यांसह, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येकाचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परतावा हमखास आहे.

आज पोस्ट ऑफिसच्या पाच अशाच योजनांबद्दल माहिती घेऊया, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता.

1. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम (Post Office Time Deposit Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत व्याज सुविधेचा लाभ वेळेवर मिळतो. जर तुम्ही ही योजना 1 ते 3 वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. जर तुम्ही ही योजना 5 वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. या योजनेतील तुमचे पैसे साडेदहा वर्षांत दुप्पट होतील.

2. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना (Post Office Sukanya Samriddhi Scheme)

ही योजना खास मुलींसाठी आहे. यामध्ये 7.6 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. जर तुम्ही त्यात पैसे गुंतवले तर ते दुप्पट होण्यासाठी सुमारे साडेनऊ वर्षे लागतात.

Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

3. पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (Post Office National Saving Certificate)

या योजनेत तुम्हाला प्रमाणपत्रे खरेदी करावी लागतात. यामध्ये 6.8 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आयकर देखील वाचवला जाऊ शकतो. या योजनेत तुमचे पैसे साडेदहा वर्षात दुप्पट होतात.

4. पोस्ट ऑफिस पीपीएफ (Post Office PPF)

PPF हा आजच्या काळात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानला जातो. यामध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते. याशिवाय या योजनेतील तुमचे पैसे दहा वर्षांत दुप्पट होतात.

या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक

5. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजना (Post Office Senior Citizen Scheme)

ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेत 7.4 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये तुमचे पैसे साडेनऊ वर्षात दुप्पट होतात.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Post office