Home /News /money /

Indian Railways: संभावित लॉकडाऊनमुळे पुन्हा धावणार श्रमिक ट्रेन्स? भारतीय रेल्वेची काय आहे योजना

Indian Railways: संभावित लॉकडाऊनमुळे पुन्हा धावणार श्रमिक ट्रेन्स? भारतीय रेल्वेची काय आहे योजना

देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशी देखील चर्चा होत आहे की श्रमिक रेल्वे (Shramik Special Trains) पुन्हा एकदा सुरू करण्याची योजना भारतीय रेल्वे (Indian Railway) आखत आहे.

    नवी दिल्ली, 11 एप्रिल: देशभरात कोरोनाचे संक्रमण (Coronavirus in India) वाढू लागले आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या नाइट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन सुरूच आहे. अनेक राज्य सरकारांना राज्यातील परस्थितीनुसार गाइडलाइन्सही जारी केल्या आहेत. सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अशावेळी महाराष्ट्रात तसंच देशातील इतर भागात पूर्णपणे लॉकडाऊन लागू शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. येणाऱ्या काळात कोरोना केसेस वाढत राहिल्या तर लॉकडाऊन (COVID-19 Lockdown) लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशी देखील चर्चा होत आहे की श्रमिक रेल्वे (Shramik Special Trains) पुन्हा एकदा सुरू करण्याची योजना भारतीय रेल्वे (Indian Railway) आखत आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य भारतीय सेंट्रल रेल्वे झोनने (Central Railway Zone) याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. रेल्वेने असे म्हटले आहे सध्या रेल्वेचा श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्याची कोणतीही योजना नाही आहे. रेल्वेने ट्विटरवरून दिली माहिती सेंट्रल रेल्वेने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे की रेल्वे श्रमिक रेल्वे सुरू करत आहे. रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे की अशाप्रकारे कोणतीही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली नाही आहे, अशी कोणतीही योजना आखलेली नाही. रेल्वेच्या काही मार्गांवर केवळ स्पेशल ट्रेन धावत आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गेल्यावर्षी देशभरात धावल्या होत्या श्रमिक स्पेशल ट्रेन्स गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता त्यावेळी श्रमिक स्पेशल ट्रेन्सचे आयोजन करण्यात आले होते. ज्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात येत होते. भारतीय रेल्वेने जवळपास 4,615 श्रमिक स्पेशल ट्रेन्सचे संचालन केले होते. ज्या माध्यमातून साधारण 63 लाखांहून अधिक लोकं त्यांच्या घरी पोहोचली होती. रेल्वे विभागाने 1 2020 पासून श्रमिक ट्रेन्सचे संचालन सुरू केले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Indian railway

    पुढील बातम्या