मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आठवड्याला 97 कोटी कमवायचा Michael Jackson, तरी 2700 एकरची आलीशान प्रॉपर्टी विकली स्वस्तात

आठवड्याला 97 कोटी कमवायचा Michael Jackson, तरी 2700 एकरची आलीशान प्रॉपर्टी विकली स्वस्तात

एका आठवड्यात 20 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 97 कोटी कमावणार दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सन  (Michael Jackson) याची कॅलिफोर्नियामधील 2700 एकरमध्ये पसरलेली नेव्हरलँड रँच  (Neverland Ranch) ही प्रॉपर्टी ज्या किंमतीला विकली गेली ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 26 डिसेंबर: दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनचे जगभरात चाहते आहेत. भारतातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अजूनही मायकल जॅक्सनचे लाखो फॉलोअर्स आहेत. या कलाकाराने प्रसिद्धी बरोबरच संपत्तीही तितकीच कमावली होती. मायकलची कॅलिफॉर्निया (California) स्थित नेव्हरलँड रँच (Neverland Ranch) ही संपत्ती उद्योगपती रॉन बर्कले यांनी खरेदी केली आहे.  मीडिया अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. बर्केल यांच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी अशी माहिती दिली आहे की, या उद्योजकाने सँटा बार्बराजवळी लॉस ऑव्हिलॉस स्थित 2700 एकरची ही संपत्ती लँड बँकिंग योजनेअंतर्गत खरेदी केली आहे. रॉन बर्कले Soho House मधील मोठे भागधारक आहेत, आणि ते जॅक्सनचे सहकारी होते. या संपत्तीची 735 कोटी रुपये होती किंमत जॅक्सनच्या या संपत्तीची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सन  (Michael Jackson) एका आठवड्यात 20 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 97 कोटी कमावणारा कलाकार होता. त्याची कॅलिफोर्नियामधील 2700 एकरमध्ये पसरलेली नेव्हरलँड रँच  (Neverland Ranch) ही प्रॉपर्टी 22 मिलियन डॉलर अर्थात जवळपास 161 कोटी रुपयांना विकली गेली आहे. 2016 मध्ये मायकल जॅक्सनच्या या संपत्तीची किंमत 10 कोटी अमेरिकन डॉलर (जवळपास 735 कोटी रुपये) मागण्यात आली होती. पुढील वर्षी ही किंमत कमी करून 6 कोटी 70 लाख अमेरिकन डॉलर करण्यात आली होती. Neverland Ranch मध्ये काय आहे खास? नेव्हरलँड रॅंच मध्ये (Neverland Ranch) 12,500 चौरस फुटांच्या मुख्य निवासस्थानाव्यतिरिक्त, याठिकाणी 3,700 चौरस फुटांचे पूल हाऊस, 50 सीटर चित्रपटगृह आणि एक डान्स स्टुडिओ आहे. या प्रॉपर्टीमध्ये मायकल जॅक्सनने डिस्नी स्टाइल ट्रेन स्टेशनही बांधले आहे. याठिकाणी फायर स्टेशन आणि धान्याचे कोठार देखील आहे. मृत्यूनंतरही जॅक्सनची अब्जावधींची कमाई 2018 मध्ये  मायकल जॅक्सनची कमाई जवळपास 2800 कोटी रुपये होती. यामध्ये अधिकतर हिस्सा ईएमआय म्यूझिक पब्लिशिंग मध्ये त्याची भागीदारी विकल्यानंतर आला होता. शिवाय सोनीबरोबर करण्यात आलेला रेकॉर्ड करार मिजाक म्यूझिक कॅटलॉग आणि मायकल जॅक्सन हॅलोविन सारख्या स्पेशल टिव्ही प्रोग्रॅममधूनही त्याची कमाई झाली होती. फोर्ब्सच्या मते जॅक्सनची कमाई Halloween स्पेशल आणि नवा अल्बन Scream मुळे वाढली.
First published:

पुढील बातम्या